Ring Ceremony Funny Video Viral : सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्न समारंभ म्हटलं की तिथे अनेक विधी, परंपरा आल्या; पण या विधी, परंपरांपेक्षा आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे नवरा-नवरीचा गेटअप. साखरपुड्यापासून ते लग्न समारंभापर्यंत नवरा-नवरीच्या गेटअपविषयी जोरदार चर्चा असते. तिची साडी फारच सुंदर होती, ब्लाऊज त्याहून छान होता, अशा चर्चा तुमच्याही कानावर पडल्या असतील. पण, बऱ्याचदा या समारंभात अशा काही घटना घडतात की, आपण विचारही केला नसेल, या घटना पाहून अनेकदा खूप हसायला येते. सध्या एका साखरपुडा समारंभातील अशीच एक हास्यास्पद घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही, नक्की काय घडलं ते जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या साखरपुडा समारंभातील नवरा-नवरीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. जो पाहून अनेकांना हसू आवरणं अवघड झालं आहे. या व्हिडीओत नवरा-नवरी साखरपुड्यानंतर स्टेजवर रोमँटिक मूडमध्ये डान्स करताना दिसत आहेत. दोघांना उपस्थित पाहुणे मंडळी चिअर करीत होती; पण त्याच वेळी अचानक नवरदेवाबरोबर अशी एक घटना घडते की, ती पाहून नवरीलाही हसू आवरता येत नाही. त्याचे घडले असे की, नवरा अगदी फिल्मी स्टाईलमध्ये नवरीच्या बोटात अंगठी घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच वेळी अचानक त्याची पँट मागून टरकन फाटते. यावेळी रोमँटिक वातावरण अचानक हास्यात बदलते. हे पाहून उपस्थित पाहुणे मंडळीदेखील जोरजोरात हसू लागतात.

सुरुवातीला नेमकं काय घडलं हे नवरदेवालाही समजत नाही; पण जेव्हा नवरीची नजर नवरदेवाच्या पँटवर पडते तेव्हा तिला हसू आवरता येत नाही. यावेळी नवरदेवाची झालेली लाजिरवाणी अवस्था व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येतेय. पण, नंतर नवरदेवाचे कुटुंबीय पटकन स्टेजवर येतात आणि त्याला कव्हर करून चेंजिंग रूममध्ये घेऊन जातात. यावेळी एक जण त्याला कव्हर करण्यासाठी आपला कोट काढून देतो. ही घटना नवरदेवासाठी लज्जास्पद असली तरी अनेकांना ते दृश्य पाहून हसणं आवरता येत नाही.

साखरपुडा समारंभातील हा हास्यास्पद व्हिडीओ @seva_can111 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत, एका युजरनं लिहिलं, “पँटलादेखील याच वेळी फाटायचे होते का?” दुसऱ्या युजरनं लिहिलं, “हे खूप हास्यापद आहे.”