Dance Video : सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नातील डान्स व्हिडीओ अनेकदा चर्चेत येतात. सध्या असाच एका तुफान डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लग्नातील नवरदेवाच्या बहिणीचा हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजुबाजूला नातेवाईक आणि मित्रमंडळ उभे आहेत आणि नवरदेवाची बहिण तुफान डान्स करताना दिसत आहे. ती काळ्या साडीत खूप सुंदर दिसत आहे. ‘शरारा शरारा’ या गाण्यावर तिने सुंदर स्टेप्स केल्या आहेत. आजुबाजूला उभे असलेली लोकं तिचा डान्स बघून टाळ्या वाजवताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा डान्स ती पेन्सिल हिल्स घालून करताना दिसत आहे.

हेही वाचा : Viral Video : ‘आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ मातीच्या चिखलात रंगला खेळ, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

sakshimaken या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा डान्स युजर्सच्या पसंतीस उतरला आहे. अनेक युजर्सनी तिच्या डान्सचे कौतुक केले आहे.
एका युजरने लिहिले आहे, “ओह माय गॉड पेन्सिल हिल्सवर डान्स करत आहे” तर एका युजरने लिहिले आहे, ” खुप छान मुली, अप्रतिम” आणखी एका युजरने लिहिले आहे, “खूप छान, मी पाच वेळ हा डान्स व्हिडीओ बघितला”