सोशल मीडियावर काही लाईक्स आणि व्हूज मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. मात्र, अनेक असेही लोक असतात जे आपल्या कृतीने इतरांना चांगले वाटेल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही तरुणांनी झोमॅटो बॉयला जो आदर आणि प्रेम दिलं आहे, ते पाहून त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही पाहा- बहिण सायकलवरुन पडू नये म्हणून चिमुकल्या भावाची धडपड, हृदयस्पर्शी Video एकदा पाहाच

kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

अनेकजण ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करण्यात व्यस्त होते. पण काही लोक या काळातही आपलं काम करण्यात व्यस्त असतात. यामध्ये अनेक फूड डिलिव्हरी करणाऱ्या लोकांचा समावेश होता. लोकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ते नववर्षाच्या पुर्वसंध्येलाही आपलं कर्तव्य बजावत होते. असाच एक डिलिव्हरी बॉय ३१ डिसेंबरच्या रात्री ऑर्डर पोहोच करायला गेला असता त्याला भन्नाट सरप्राईज मिळालं आहे.

हेही पाहा- अरे यांना आवरा रे…, डान्स करतानाच काढायला लागला खुन्नस, मित्राला उचलून फेकल्याचा Video होतोय व्हायरल

हा किस्सा एका झोमॅटो बॉयसोबत घडला आहे. किशन श्रीवत्स नावाच्या व्यक्तीने या घटनेचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आणि त्याच्या मित्रांनी एका डिलिव्हरी बॉयसोबत नवीन वर्षाचं स्वागत केल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये, डिलिव्हरी बॉयच्या हाताने केक कापत त्याला नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये या मुलांनी सहभागी करुन घेतल्याचं पाहायला मिळतं आहे.

नेटकऱ्यांना आवडला व्हिडीओ –

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये किशनने सर्व किस्सा सांगितला आहे. त्याने लिहलं की, तो आणि त्याच्या मित्रांनी झोमॅटोवर रात्री ११ वाजता काही खाद्यपदार्थ ऑर्डर केले, जे योगायोगाने मध्यरात्री १२ च्या सुमारास मिळाले. त्यामुळे ती ऑर्डर घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयलाही आम्हा आमच्या पार्टीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. शिवाय डिलिव्हरी बॉयलाच नवीन वर्ष सेलेब्रेशनचा केक कापायला लावला. अनपेक्षित असं सरप्राईज मिळाल्यामुळे डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या मुलांच्या कृतीचं कौतुक करत आहेत.

Story img Loader