Lion Herd Viral Video : रानवनात भटकणारे वाघ, बिबट्या, सिंहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीतही कधीतरी मुक्त संचार करताना दिसतात. बिबट्या, वाघासारख्या प्राण्यांनी पाळीव प्राण्यांसह माणसांवरही जीवघेणा हल्ला केल्याच्या अनेक घटना व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. प्राणी रस्त्यावरून जात असताना त्यांच्यापासून नागरिकांनी चार हात लांब राहावे, जेणेकरून ते प्राणी हल्ला करणार नाहीत, असं आवाहन वनविभागाकडून लोकांना करण्यात येतं. प्राण्यांसोबत मस्ती करुन त्यांना चिडवण्याचा प्रयत्न करणेही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे रस्त्यावरून जात असताना प्राण्यांना वाट करुन देणं, हेच शहाणपणाचं लक्षण ठरतं.
हायवेवर सिंहांचा कळप दिसताच एकापाठोपाठ एक गाड्या थांबल्या अन्….
अशाच प्रकारचा सिंहांच्या कळपाचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सिंहांसोबत सिंहिणही रस्त्यावरून जाताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. जंगलातून सिंहाचा कळप हायवेवर आल्यावर वाहनचालकांची एकच दमछाक उडाली. सिंहांना पाहताच वाऱ्याच्या वेगानं धावणारी वाहने चालकांनी काही सेकंदातच थांबवली. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
इथे पाहा व्हिडीओ
@lion_photo_ins नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर सिंहांच्या कळपाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक खतरनाक कॅप्शनही देण्यात आलं आहे. “ही आहे खरी भीती,”अशाप्रकारचं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर शेकडो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही करताना दिसत आहेत. सिंहांचा कळप रस्त्यावरून जात असताना, समोरून येणाऱ्या गाड्या एकापाठोपाठ एक हायवेवर थांबल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. सिंह त्यांच्या खतरनाक अंदाजात रस्त्यावरून जात असल्याचं दिसताच चालकांचा थरकाप उडाला आणि वाहने हायवेवरच थांबवली. त्यानंतर सिंहाचा कळप जणू काही शाही थाटातच त्याच्या जंगल सफारीला निघाला असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.