Marriage Ceremony Viral Video : लग्नसराईचा सीजन सुरु झाल्याने लग्नसोहळ्यातील खळबळजनक घटना सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण एखाद्या लग्न समारंभात जेवणाची सोय आहे का? असा प्रश्न काही वऱ्हाड्यांना नक्कीच पडत असेल. प्रेमप्रकरणावून काही लग्नसोहळ्याता वादविवाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण एका ठिकाणी काहिसं वेगळच घडलं आहे. नवऱ्याच्या नातेवाईकाल जेवणात पनीरचा पीस मिळला नाही, म्हणून वऱ्हाड्यांमध्ये चांगलीच जुंपली. ही घटना उत्तर प्रदेशमधील बागपट येथील असल्याचं बोललं जात आहे. पनीर खाण्यावरून झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
लग्नमंडपात उपस्थित असलेले वऱ्हाडी एकमेकांसोबत भांडण करत असल्याचं या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. लाथाबुक्क्यांनी आणि हाताने संतापलेले वऱ्हाडी तुंबळ हाणामारी करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. रस्त्यावरच लग्नाला आलेले पाहुणे एकमेकांना शिवीगाळ करुन मारहाण करत होते. आदित्य भारद्वाज नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शमध्ये दावा करत म्हटलंय, “लग्नात नवऱ्याच्या नातेवाईकाला पनीर खायला न मिळाल्याने तुफान राडा झाला. उत्तर प्रदेशच्या बागपतमधील ही घटना आहे.”
इथे पाहा व्हिडीओ
दिल्लीच्या रोहिणी परिसरातही अशाच प्रकारची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. लग्नसोहळ्यात डीजे वाजवण्यावरून काही तरुणांनी वाद घातला होता. त्यानंतर तरुणांच्या एका टोळक्याने वाद करणाऱ्या कॅटरिंग स्टाफला चांगलच धुतलं होतं. लग्नात समारंभात घडणाऱ्या धक्कादायक घटना दिवसेंदिवस इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. नवरा-नवरी भर लग्नमंडपात थिरकतानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण उत्तर प्रदेशच्या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. छोट्याशा पनीरच्या पीसवरून वऱ्हाड्यांनी जोरदार भांडण केलं, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.