दिल्लीतील एटीएमबाहेरचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेली कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न दोन चोरांनी केला. मात्र, एटीएमबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने चोरांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी चोर आणि सुरक्षारक्षकामध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत सुरक्षारक्षक आपल्यावर वरचढ ठरतोय, हे लक्षात येताच एका चोराने सुरक्षारक्षकाच्या हातामधील बंदूक हिसकावून घेतली. या बंदूकीतून त्याने सुरक्षारक्षकाच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी सुरक्षारक्षकाच्या पोटात लागली. त्यामुळे सुरक्षारक्षकाचा प्रतिकार कमी होईल, असा चोराचा अंदाज होता. मात्र, या साहसी सुरक्षारक्षकाने शेवटपर्यंत चोरांना एटीएम केंद्रात शिरून दिले नाही. अखेर आपला प्रयत्न अयशस्वी होताना पाहून चोरांनी तिथून काढता पाय घेतला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून या सुरक्षारक्षकाचे कौतुक होत आहे.

Story img Loader