पोपट हा अतिशय मजेदार पक्षी आहे आणि तो माणसांचं अनुकरण करण्यात पटाईत असतो. अनेक पोपट तर माणसांच्या भाषेत बोलताना तुम्ही पाहिले असतील. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, असेही काही पोपट आहेत जे फोनच्या रिंगटोनची नक्कल करू शकतात. आम्ही ज्या पोपटाबद्दल बोलत आहोत तो ‘गुच्ची’ नावाने प्रसिद्ध झालेला पोपट आहे, तो आयफोनच्या रिंगटोनची नक्कल करू शकतो आणि तेही इतक्या चांगल्या पद्धतीने की तुम्हाला खऱ्या आणि बनावट रिंगटोनमधील फरकच करता येणार नाही. या पाळीव पोपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.
एक पोपट मोबाईलमधल्या रिंगटोनची किती अचूकपणे अनुकरण करू शकतो, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ‘गुच्ची गौडा’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ सर्वप्रथम पोस्ट करण्यात आला होता. हे अकाउंट Vosmarie Eclectus Pets च्या व्हिडीओ आणि फोटोंना समर्पित आहे. पूजा देवराज आणि हर्षित हे दोघे हे अकाउंट चालवतात.
हा व्हिडीओ सोमवारी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आणि त्यानंतर हा व्हिडीओ ‘व्हायरल हॉग’ने शेअर केला. बघता बघता हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की, आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले असून लोक या व्हिडीओवर लाईक्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव करत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : असं कुणी करतं का? कपल डान्स करताना चुकली म्हणून तिला सगळ्यांसमोर मारू लागला…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : संतापलेल्या नवरीने ८ लाख रुपयांचे ३२ वेडिंग गाऊन कापले, पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना सुरूवातीला आपल्या आजुबाजुला कुणाचा आयफोनची रिंग वाजतेय की काय असा भास होऊ लागतो. प्रत्येक जण टॅलेंटेड पोपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याच मोह लोकांना आवरता येत नाहीय. एका युजरने लिहिले, ‘कदाचित मी पोपटाकडून ऐकलेला हा सर्वात प्रभावी आवाज आहे, अप्रतिम.’