Gudhi padawa 2025 ukhane: गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आणि नवीन आरंभाचा प्रतीक. हा सण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.गुढीपाडव्याला लोक आपली घरे सजवतात आणि घरात नवीन वस्तूंची खरेदी या दिवशीच केली जाते. गाडी, सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. गुढीपाडव्याला पर्यावरणीय महत्त्व देखील आहे. या दिवशी लोक निसर्गाचे आभार मानून त्याचे रक्षण करण्याचा संकल्प करतात. नव विवाहित जोडपे घरगुती व सार्वजनिक ठिकाणी नव नवीन खेळांमधे व स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि उखाणे घेतात. अशाच नव विवाहीत महिलांसाठी आणि सुवासिनींसाठी हे भन्नाट उखाणे नक्की लेक्षात ठेवा..सगळेच करतील कौतुक…
हे घ्या एकापेक्षा एक भारी उखाणे
नव वर्षाचा पहिला सण आला गुढीपाडवा, ….रावांच्या जीभेवर असतो, साखरेसारखा गोडवा.
चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट,….रावांच्या आयुष्यात येवो, नव्या स्वप्नांची लाट.
मांगल्याचे तोरण यशाची गुढी … सोबत जपल्या पुर्वीच्या परंपरागत रूढी
मांगल्याचा गुढीला घातल्या साखरेच्या गाठी …चे नाव घेते खास तुमच्यासाठी
ढीसाठी रेशमी साडी आणि दारात सुंदर रांगोळी … साठी आज केली पुरणपोळी
नुतन वर्षाची चाहूल घेवून आला गुढीपाडवा … आणि… संसारात आनंद सदैव वाढावा
आजच्या मंगलदिनी राम लक्ष्मण सीता परतले अयोध्या नगरी …चे नाव घेऊन गुढी उभारली दारी
नव वर्षाचा पहिला सण आला गुढीपाडवा ,……रावांच्या जीभेवर असतो , साखरे सारखा गोडवा
गुढीपाडव्याला स्वयंपाक केला वरण भात आणि श्रीखंड, …..रावांचे नाव घेते आणि देवाकडे मागते सौभाग्य अखंड.
नविन वर्षाच्या सुरुवातीला रंगवले जातात स्वप्न, …….रावांच्या संसारात मी आहे मग्न.
उंच नभात शोभून दिसे गुढीचा थाट ,….रावाच नाव घेते , आता सोडा माझी वाट..
गुडी पडवाचा दिवशी ,सर्वांचे व्हावे स्वप्न पूर्ण माझ्या शिवाय , ….राव आहेत अपूर्ण
दारी ऊंच गुडी व्हावी यशाची वृद्धी,…..रावांच नाव घेते घरी यावी सुख समृद्धी.
यावर्षी नवीन वर्ष २०२५ मध्ये, गुढी पाडवा ३० मार्च २०२५, रविवार रोजी साजरा केला जाईल. या खास दिवशी जर तुम्हाला तुमच्या अहोंच नाव उखाण्यात घायचे असेल तर हे युनीक उखाणे वाचाच