भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या सध्या ट्विटरवरील सक्रियतेमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मधुचंद्रासाठी निघालेल्या एका जोडप्याच्या मार्गातील विघ्न दूर केल्यामुळे सोशल मिडीयावर त्या अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरल्या होत्या. फैझन पटेल हा सोमवारी त्याची पत्नी सना हिच्यासोबत मधुचंद्रासाठी युरोपला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, सनाचा पासपोर्ट हरवल्यामुळे फैझनवर एकट्यानेच युरोपला जाण्याची वेळ आली. यावेळी फैझनने सुषमा स्वराज यांच्याशी ट्विटरवरून संपर्क साधून त्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. सुषमा स्वराज यांनी फैझनच्या या ट्विटची दखल घेत तत्काळ त्याच्या पत्नीला डुप्लिकेट पासपोर्ट मिळवून देण्याची व्यवस्था केली. ट्विटरवरील फैझल आणि स्वराज यांचे संभाषण सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाले होते. यानिमित्ताने सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बिनकामाच्या ट्विटसना दिलेले मजेशीर आणि हजरजबाबी रिप्लायही व्हायरल झाले आहेत.
सुषमा स्वराज यांच्या मदतीमुळे त्यांचा मधुचंद्र निर्विघ्न
काही दिवसांपूर्वी @babuenterprises या ट्विटर अकाऊंटवरून स्वराज यांना एका व्यक्तीने स्वत:ची गाडी बिघडल्याची तक्रार केली. तेव्हा स्वराज यांनी त्याला शांतपणे उत्तर दिले. मला माफ करा, कृपया तुमची गाडी दुरूस्तीसाठी घेऊन जा, अशा शब्दांत स्वराज यांनी संबंधित व्यक्तीला मार्गी लावले.
sushma-roll1
याशिवाय, सुषमा स्वराज यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेल्या व्यक्तीच्या मुलीला दिलेला रिप्लायही चांगलाच गाजला होता. या १६ वर्षाच्या मुलीच्या वडिलांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हा या मुलीने ट्विट करून स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली होती. माझे वडील गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकले आहेत. मात्र, याप्रकरणात त्यांची काहीही चूक नाही. मी फक्त १६ वर्षांची आहे, अशा आशयाचे ट्विट या मुलीने केले होते. तेव्हा सुषमा स्वराज यांनी ट्विट करून या मुलीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
sushma-roll

Story img Loader