Shocking Video: सोशल मीडियावर अनेकदा लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात वरातीचे, वधू-वराचे, पाहुणेमंडीळींचे खास क्षण टिपले गेलेले असतात. अशा व्हिडीओंसह अनेकदा लग्नसमारंभात भांडण किंवा मारामारी होतानाच्या बातम्यादेखील अनेकदा कानावर आल्या असतात. पण सध्या लग्नातील एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एका पाहुण्याला गावकऱ्यांनी वीजेच्या खांबाला बांधून मारलं. नेमकं असं घडलं तरी काय जाणून घेऊया…
दारूच्या नशेत असलेला एक व्यक्ती उत्तर प्रदेशातील लग्नाच्या मिरवणुकीतून हरवला आणि देवरिया येथील घराचा दरवाजा त्या व्यक्तीने ठोठावला. बुधवारी रात्री गोरखपूर येथून निघालेली मिरवणूक देवरियाच्या तारकुलवा गावातील स्थानिक विवाह मंडपात पोहोचली तेव्हा त्या व्यक्तीचा रस्ता चुकला. लग्नाचा पाहुणा एकटाच भटकत गावातील एका घरात पोहोचला, ज्यामुळे लोकांना तो चोर असल्याचा संशय आला.
जेव्हा त्याने देवरिया येथील घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा लोकांनी आरडाओरड करून परिसरातील इतरांना चोराबद्दल सावध केले. त्यांनी लग्नाच्या पाहुण्याला चोर समजले आणि स्थानिक भीतीने ओरडू लागले. या परिसरात नुकतीच एका दिवसापूर्वी झालेल्या चोरीमुळे हा गोंधळ उडाला असावा, असे सांगण्यात आले.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एका विजेच्या खांबाला या पाहुण्याला गावकऱ्यांनी बांधले. त्यानंतर काठीने त्याला मारहाण केली. नंतर सगळ्याच गावकऱ्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. लग्नाच्या मिरवणूकीत रस्ता चुकलेल्या या पाहुण्यावर गावकऱ्यांनी लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. पण नंतर लक्षात आले की त्यांनी चुकीच्याच माणसाला चोर समजले.
हा व्हायरल व्हिडीओ @WeUttarPradesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “देवरियाच्या पाथरदेव गावात बुधवारी रात्री गोरखपूरहून आलेल्या लग्नाच्या मिरवणुकीत एक तरुण दारूच्या नशेत रस्ता चुकला. स्थानिक लोकांनी तो चोर समजून त्याला पकडून बेदम मारहाण केली.” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
हेही वाचा… हद्दच झाली! भरमेट्रोत महिलांसमोरच प्रवाशाने केलं अश्लील कृत्य, VIDEO पाहून उडेल थरकाप
काही वेळातच पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. घटनेदरम्यान हा माणूस जखमी झाला होता, त्यानंतर त्याच्या जखमांवर उपचार करण्यात आले. त्याला शोधत आलेल्या त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले.
व्हिडीओ व्हायरल होताच एका युजरने कमेंट करत लिहिलं, “देशात माणुसकी इतक्या खालच्या पातळीला गेलीय की कोणाकडे माणूस मदतीलाही जाऊ शकत नाही.”