स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा अशी ओळख असलेल्या रत्नागिरीतल्या गुहागर येथे दोन मच्छीमारांना  मासेमारी करताना जाळ्यात फ्लाईंग फिश सापडले. खोल समुद्रात आढळणारे हे मासे पाण्यावर काही मीटर उंचीवर उडू शकतात. उडण्याच्या या कौशल्यामुळे त्यांना ‘फाईंग फिश’ असे नाव पडले. पंख असलेल्या या माशांना कुतूहलापोटी या दोन मच्छीमारांनी किना-यावर आणले. पर्यटकांच्या सांगण्यावरून या माशांना पुन्हा समुद्रात  सोडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

VIDEO : ६ वर्षांनंतर रहस्यमयी शार्क माशाचा व्हिडिओ प्रदर्शित

रत्नागिरी येथील असगोली येथे दोन मच्छीमार समुद्रात मासेमारी करायला गेले असताना त्यांना फाईंग फिश सापडले. हे मासे त्यांच्या जाळ्यात अडकले होते. यापूर्वी त्यांनी अशा माशांना कधीच पाहिले नव्हते, त्यामुळे उत्सुकतेपोटी त्यांनी या माशांना किना-यावर आणले. तेव्हा पूर्वी कधीही न पाहिलेले हे मासे फाईंग फिश प्रकारातले असल्याचे त्यांना समजले. फ्लाईंग फिश या माशाच्या जवळपास ४० हून अधिक प्रजाती आहेत. या माशांचे पर मोठे असतात. त्याचा ते पंखासारखा वापर करतात. हे मासे जितक्या सहजपणे पाण्यात पोहू शकतात तितक्याच सहजपणे ते पाण्याच्या बाहेरही उडू शकतात. साधरण एक फूट लांबीचे हे मासे असून हवेत चार फूटांपर्यंत ते झेप घेऊ शकतात. अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात हे मासे प्रामुख्याने आढळतात. खोल समुद्रात हे मासे आढळत असून किना-यावर ते क्वचितच पाहायला मिळतात.

VIDEO : दोन कासवांचा वर्चस्वासाठी संघर्ष