गिनीज बुकात आपले नाव यावे असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी बरीच लोकं काहीतरी भन्नाट, वेगळं किंवा भव्य गोष्टी करण्याची धडपड करत असतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डदेखील आपल्या सोशल मीडियावरून सतत अशा विक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अशात मागच्या वर्षी म्हणजे, २०२३ या वर्षात गिनीज बुकात अनेक विक्रम बनवण्यात किंवा मोडण्यात भारतीयांचा नंबर पुढे होता. यापैकी आपल्या देशातील हे पाच आगळेवेगळे जागतिक विक्रम पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीयांचे पाच भन्नाट जागतिक विक्रम

१. सामूहिक सूर्यनमस्काराचा विक्रम

आपल्या देशात वर्षानुवर्षे केला जाणारा योगा हा आता पाश्चिमात्य देशांनाही आवडू लागला आहे. इतर देशातही तंदुरुस्त राहण्यासाठी योगासने, विशेषतः सूर्यनमस्कार करण्याची पद्धत सुरू झाली आहे. अशातच, गुजरातमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार घालून जागतिक विक्रम बनवण्यात आला आहे. हे सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यासाठी १०८ ठिकाणांहून तब्ब्ल चार हजार योगाप्रेमींनी हजेरी लावली होती. याची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घेतली असून, आपल्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : गेल्या १०० वर्षांपासून अविरत चालू आहे हा दिवा! गिनीज बुकात नोंद झालेल्या ‘या’ दिव्याचे नाव जाणून घ्या….

२. डोक्यावर लोखंडी रॉड वाकवण्याचा विक्रम

विस्पय खारदी यांनी आपल्या डोक्यावर एका मिनिटांत चक्क २४ लोखंडी रॉड वाकवल्याचा जागतिक विक्रम बनवत गिनीज बुकात नाव कोरले आहे. या विक्रमाचा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून शेअर केलेला आहे.

३. सर्वात मोठा पत्त्यांचा बंगला बांधण्याचा विक्रम

लहानपणी पत्ते खेळताना आपण गंमत म्हणून पत्ते एकमेकांना लावून किमान एक माळ्याचा बंगला बनवण्याचा प्रयत्न करत असू. तेव्हा अनेक प्रयत्नानंतर कधीतरी त्यात आपण यशस्वी व्हायचो. मात्र, १५ वर्षांच्या अर्णव दागा या मुलाने चक्क १ लाख ४३ हजार पत्त्यांचा वापर करून सिटी ऑफ जॉय [City of joy] या जागेची भव्य प्रतिकृती तयार केली आहे. यात त्याने, लेखकाची इमारत, शाहिद मिनार, सॉल्ट लेक स्टेडियम, संत पॉल्सचे मुख्य चर्च [Cathedral] बनवले आहे.

४. सर्वात लांब केसांचा विक्रम

अनेक स्त्रियांचे लांबसडक केस असतात. मात्र, तरुण मुलाचे सर्वात लांब केस असण्याचा हा जागतिक विक्रम १५ वर्षांच्या सिदकदीप सिंग चहल या मुलाच्या नावावर आहे. या मुलाचे केस १३० सेंटीमीटर इतके लांब आहेत.

हेही वाचा : या पठ्ठ्याने चक्क ‘एक लिटर’ टोमॅटो सॉस पिऊन बनवला ‘गिनीज रेकॉर्ड’! व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ पाहा

५. दिल्लीच्या सर्व मेट्रो स्थानकांवर प्रवास करण्याचा विक्रम

द्वारकेमधील फ्रीलान्सर संशोधक शशांक मानू यांनी दिल्लीमधील सर्व मेट्रो स्थानकांमधून प्रवास करण्याचा आगळावेगळा असा विक्रम रचला आहे. त्याने, १५ तास २२ मिनिटे आणि ४९ सेकंदांमध्ये दिल्ली मेट्रोच्या १२ लाईन्सवरील, २८६ स्थानकांवर प्रवास केला आणि गिनीज बुकात आपले स्थान निर्माण केले आहे.

तर असे हे योगासनांपासून ते मेट्रो प्रवासापर्यंत भारतीयांचे पाच भन्नाट आणि आगळेवेगळे असे जागतिक विक्रम आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guinness world records check out this 5 interesting world records by indians dha