अलीकडेच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने (GWR) जगातील सर्वात वृद्ध जिवंत कुत्र्याची इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या कुत्र्याने सर्वात जास्त काळ जगण्याचा विक्रम केला होता. जीडब्ल्यूआरच्या अधिकृत वेबसाइटनुसार, टॉबीकीथ फ्लोरिडा येथील चिहुआहुआ जातीचा कुत्रा, २१ वर्षे आणि ६६ दिवसांच्या वयात जगातील सर्वात जुना जिवंत कुत्रा ठरला. टोबीकीथ नावाच्या २१ वर्षांच्या कुत्र्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात वयस्कर जिवंत कुत्रा म्हणून नोंद करण्यात आली होती. पण आता हे विजेतेपद अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील २२ वर्षीय टॉय फॉक्स टेरियर या पेबल्सने हिसकावून घेतले आहे.
त्याच्या मालकाने रेकॉर्डसाठी अर्ज केल्यानंतर पेबल्सला या शीर्षकाचा नवीन धारक म्हणून घोषित करण्यात आले. २८ मार्च २००० रोजी जन्मलेल्या पेबल्सचे वय २२ वर्षे ५९ दिवस आहे. “पेबल्स ही लहान मुलांसारखी आहे जिला दिवसा झोपायला आवडते आणि ती रात्रभर जागते,” तिची मालकीण ज्युली ग्रेगरी यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला सांगितले.
Photos : ‘या’ आहेत सर्वात जास्त काळ जगणाऱ्या कुत्र्यांच्या प्रजाती
आम्ही खरोखरच सन्मानित आहोत. पेबल्स प्रत्येक गोष्टीत आमच्याबरोबर आहे. चढ-उतार, चांगले आणि वाईट काळ, तिने नेहमीच आमच्या जीवनाला प्रकाशमान केले आहे,” ज्युली पुढे म्हणाली. लहान कुत्री हे ग्रेगरी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे.