लोकसभा निवडणुकांचे वारे देशात वाहू लागले असतानाच त्याचा परिणाम आता थेट लग्नपत्रिकांवरही दिसून येत आहे. सोशल मिडियावर सध्या एका लग्नाचा पत्रिका व्हायरल होत आहे. या लग्न पत्रिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लग्नामध्ये आहेर न देता ती रक्कम भाजपाला पक्षनिधी म्हणून द्यावी असंही या पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पत्रिकेच्या दुसऱ्या बाजूला सध्या देशभरात चर्चेत असणाऱ्या राफेल मुद्दा सोप्या भाषेत समजवून सांगण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूरतमधील सिटीलाइट येथे राहणारा युवराज याने ही आगळीवेगळी पत्रिका छापली आहे. पेशाने इंजिनयर असणारा युवराज जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साक्षी या मुलीशी विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नपत्रिकेमध्ये दोन्ही बाजूकडील कुटुंबियांची नावे न देता भाजपा आणि राफेलबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तुम्ही नमो अॅप्लिकेशनवरून भाजपाला देणगी द्यावी हीच आमच्या लग्नाची तुम्ही दिलेली भेट असेल असं या पत्रिकेमध्ये म्हटले आहे. लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांनी आगामी निवडणुकीमध्ये भाजपाला मतदान करुन पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी आम्हाला मदत करावी असं म्हटलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१९ च्या निवडणुकांमध्ये दिलेले मत हिच आमची भेटवस्तू’ असं वाक्य या पत्रिकेत ठळक अक्षरात लिहीण्यात आले आहे.

या लग्न पत्रिकेच्या दुसऱ्या बाजूला ‘किप काम अॅण्ड ट्रस्ट मोदी’ या मथळ्याखाली राफेल प्रकरणाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ‘किप काम अॅण्ड ट्रस्ट मोदी’ या मथळ्याच्या दोन्ही बाजूंना राफेल विमानांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्याखाली राफेल करार नऊ मुद्द्यांमध्ये समजवण्यात आला आहे. संरक्षण मंत्री निर्माला सितारमन यांनी काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावरून हे नऊ मुद्दे राफेल करार समजवण्यासाठी छापण्यात आले आहेत.

सध्या या लग्नपत्रिकेची सोशल मडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.