देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे, अनेक ठिकाणी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. जुनागडसह अनेक भागात एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.

गुजरातमधील पुराशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रस्त्यावरील वाहने पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या भर पावसात साचलेल्या पाण्यातून चक्क गोदामात ठेवलेले सिलेंडर्स वाहून गेल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या नवसारी परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. यात एका गॅस सिलेंडर गोदामात ठेवलेले शेकडो सिलेंडर खेळण्यांप्रमाणे पाण्यातून वाहत जाताना दिसत आहेत. पाणी छतापर्यंत तुंबल्याने हे सिलेंडर पाण्यात तरंगत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्ती हा प्रकार पाहून चिंतायुक्त भावना व्यक्त करताना ऐकू येत आहेत.

हेही पाहा- पुरात वाहून जाणाऱ्या गायीचे तरुणांनी वाचविले प्राण, मुस्लीम तरुणाचीही मिळाली साथ; Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

गॅस सिलेंडर वाहून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल –

व्हायरल व्हिडीओमध्ये एका गोदामात शेकडोगॅस सिलेंडर ठेवलेल्याचं दिसत आहे, पुराचे पाणी गोदामात शिरळ्यामुळे सिलेंडर पाण्यात तरंगू लागतात. हे सिलेंडर एका गेटमधून भरधाव वेगाने वाहत जाताना दिसत आहेत. शिवाय या हे सिलेंडर वाहून गेल्यामुळे काही दुर्घटना तर होणार नाही ना? अशी भिती परिसरातील नागरिकांना सतावत आहे.

Story img Loader