Gujarat Flood Viral Viral: संपूर्ण भारतात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त होत आहे. तर दुसरीकडे सखल भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या वाढताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तर रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचले आहे. या पुरामुळे झालेल्या नुकसानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच पूरस्थितीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. यात एक व्यक्ती चक्क पुराच्या पाण्यात थर्माकोलवर झोपून पावसाचा आनंद लुटत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचे सांगितले जात आहे. जिथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. एकीकडे या पुरामुळे लोक त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे या पुराच्या पाण्यात एक व्यक्ती मजा करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मोठ्या थर्माकोलवर आडवा झोपून पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाताना दिसत आहे. यादरम्यान हा व्यक्ती हात हलवत लोकांकडे बोट दाखवतो. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती इतकी आनंदी दिसत आहे की, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. मुसळधार पावसात ही व्यक्ती रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्याचा आनंद घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील सर्व नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गुजरातमधील बहुतांश भागात पाणी साचले आहे. रस्त्यावरही पाण्याचा जोरदार प्रवाहामुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. राज्यातील पूरग्रस्त भागात लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण यात एक मजेदार व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.