CPR To Snake Video Viral: एका बाजूला माणूस माणसाचीच मदत करताना दिसत नाही, तिथं मुक्या प्राण्यांना कोण विचारणार. रस्त्यात एखादा अपघात झाला किंवा एखाद्याला मारहाण होत असेल तर संबंधितांना वाचविण्याऐवजी लोक त्यांचे व्हिडीओ काढण्यात मग्न असतात. नुकतेच मालाडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्याला फेरीवाले, रिक्षावाल्यांनी जीवे मारले. याही घटनेत लोक फक्त व्हिडीओ काढत होते. पण गुजरातच्या वडोदरामध्ये एक आश्चर्यजनक आणि तितकाच चमत्कारीक प्रसंग घडला आहे. अर्थात या घटनेचाही व्हिडीओ आता व्हायरत होत आहे. पण या व्हिडीओत एका तरुणानं जीवन-मृत्यूशी झगडणाऱ्या एका सापाला तोंडानं सीपीआर देऊन वाचवलं आहे. सध्या या तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ वडोदराचा असल्याचे सांगितले जात आहे. सर्पमित्र असलेला यश तडवी याने एका सापाला मरणाच्या दारातून खेचून आणलं. वडोदरा येथील एका परिसरात साप आढळल्याचा कॉल आल्यानंतर यश त्याठिकाणी पोहोचला. तिथे एक फुटाएवढा छोटा साप निपचित पडला होता. साप काहीच हालचार करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर यश तडवीने त्याला तोडांने सीपीआर देण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा >> त्याची चूक काय? रस्त्यावर झोपलेल्या माणसाला आधी काठीने मारलं मग…, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल

यशने मागचापुढचा विचार न करता, सापाला विशिष्ट पद्धतीनं हातात पकडलं आणि त्याचं तोंड उघडून तोडांनं त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला. तीन मिनिटे तो सापाला सीपीआर देत होता. पहिल्या दोन प्रयत्नांत सापाने काहीच हालचाल केली नाही. पण नाउमेद न होता यशने पुन्हा तिसऱ्यांदा प्रयत्न केले, तेव्हा कुठे सापाने थोडी हालचाल केली. यावरून साप जिवंत असल्याचे सिद्ध झाले. यशने सापाला जीवनदान दिले. तसेच सापाला बरे केल्यानंतर वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

एकदा व्हिडीओ बघा:

उत्तर प्रदेशमध्येही घडली अशीच घटना

माणसाने मुक्या प्राण्याला वाचविण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी मे २०२४ मध्येही उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे विकास तोमर नावाच्या पोलीस शिपायाने एका माकडाला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचविले होते.

हे ही वाचा >> ‘भावा, जीव गेला की तो परत येत नाही…’ धबधब्यावर रील बनवणाऱ्या तरुणाचा पाय घसरला; पुढे जे घडलं VIDEO पाहून अंगावर येईल काटा

बुलंदशहर येथे एक माकड झाडावरून खाली पडलं होतं. विकास तोमर यांनी तडफडणाऱ्या माकडाला पाणी पाजले, त्याच्या छातीवर दाब देऊन त्याला सीपीआर दिला. उकाड्यामुळं बेहाल झालेल्या माकडाला पाण्यानं आंघोळ घातली आणि त्याला पुन्हा ताजातवाणा करत वनविभागाच्या हवाली केले. या घटनेचाही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या दोन्ही प्रकारात माणूस आणि प्राण्यांमध्ये असलेले हळवे बंध दिसून आले. नेटिझन्सनीही या दोन्ही प्रसंगाचे तोंडभरून कौतुक केले आहे.