रिल्स तयार करणे ही आजच्या सोशल मीडियाच्या जगात सामान्य गोष्ट झाली आहे. आज जवळपास प्रत्येकजण रिल्स व्हिडीओ तयार करताना दिसतात. यापैकी काही व्हायरल व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक व्हिडीओमध्ये विचित्र प्रकार करताना दिसतात. कित्येकदा लोक आपला जीव धोक्यात टाकून व्हिडीओ करतात. सार्वजनिक ठिकाणी अशा व्हिडीओ करण्यावर बंदी घालण्यात आली असूनही असे प्रकार सातत्याने होत असतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी या तरुणीच्या कृत्यावर राग व्यक्त केला आहे. खरं तर व्हायरल व्हिडीओ मध्ये एक तरुणी भररस्त्यात योगा करताना दिसत आहे.
रस्त्यावर योगा करत होती तरुणी
सोशल मीडियावर रोज एकापेक्षा एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ फार कमालीचे असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या गुजरातमधील राजकोट शहरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी रस्त्याच्या मधोमध योगा करत आहे. कसलीही पर्वा न करता तरुणी भररस्त्यामध्ये योगा करत आहे ज्यामुळे एखादा मोठा अपघात होऊ शकतो. याबाबत गुजरात पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा – अचानक मेट्रोमध्ये सोफा घेऊन शिरले दोन व्यक्ती; व्हायरल व्हिडीओ पाहून चक्रावले लोक
गुजरात पोलिसांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की ४० वर्षीय तरुणीचे नाव दीना परमार असल्याचे समजते जी एक सोशल मीडिया इनफ्लुएंसर आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकतो,” ही तरुणी कशाप्रकारे रस्त्यावर योगअभ्यास करताना दिसते आहे. तरुणी योगा करताना पाहून रस्त्यावर अचानक गाड्या थांबताना दिसत आहे.”
हेही वाचा – बापरे! अवघ्या ४ वर्षाच्या चिमुकल्याने चालवली तब्बल १९५ किलो वजनाची Royal Enfield; व्हिडीओ तुफान व्हायरल
इंस्टाग्रामवर गुजरात पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.२३ सप्टेंबर रोजी हा व्हिडीो शेअर केला आहे. व्हिडीओवर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. ज्यामध्ये परमार तिने केलेल्या निष्काळजपणे केलेल्या कृत्याची माफी मागताना दिसत आहे. दंड भरल्यानंतर परमार यांना पोलिसांनी सोडून दिले आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी असे व्हिडीओ करू नये असा सल्ला यावेळी दिला आहे.