आपण जसे कर्म करतो तसेच फळ मिळते असं आपणाला लहानपणापासून शिकवलं जातं. शिवाय अनेकदा वाईट कर्म करताना त्याचे फळ त्याचवेळी मिळते. सध्या असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या व्यक्तीबरोबर घडला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक चोरटा शोरूमच्या आवारात उभ्या केलेल्या ट्रॅक्टरची चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक ट्रॅक्टर सुरू होतो आणि त्याच्या अंगावरुन जातो. शिवाय हा चोरटा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्यानंतर तो जे काही करतो ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. हो कारण ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्यानंतरही हा चोरटा काहीच झालं नसल्यासारखा पुन्हा उठून उभा राहतो आणि ट्रॅक्टरमध्ये जाऊन बसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे प्रकरण गुजरातमधील अरावल्लीच्या मोडासा शहरातील हजीरा भागातील असल्याचं सांगण्यात येत आहे. येथे एक चोरटा रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर चोरण्यासाठी आला होता. तो ट्रॅक्टरमध्ये काहीतरी करत असताना अचानक ट्रॅक्टर सुरू होतो, यावेळी चोरट्याचा पाय टायरखाली सापडतो, यावेळी तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण ट्रॅक्टरच्या ताकदीपुढे त्याचं काहीही चालत नाही. त्यामुळे ट्रक्टर काही क्षणातच त्याला चिरडून पुढे निघून जातो.

हेही पाहा- VIDEO: लोकांची धावपळ आणि किंकाळ्या! मोरोक्कोतील भूकंपादरम्यानची हृदय पिळवटून टाकणारी दृश्य CCTV मध्ये कैद

शोरूममधून चोरला ट्रॅक्टर

ट्रॅक्टरच्या मागील टायरखाली येऊनही चोरट्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. कारण अंगावरुन ट्रॅक्टर गेल्यानंतरही चोर उठून लगेच त्याच ट्रॅक्टरमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तर जन्माष्टमीनिमित्त शोरूम बंद असल्याने हा चोरटा चोरी करण्यासाठी शोरूममध्ये गेला आणि त्याने ट्रॅक्टर चोरल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या चोरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शोरूमचे मालकाने नेतराम शाखेत ट्रॅक्टर चोरीची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून काही तासांतच एका गावातून ट्रॅक्टर जप्त केला. मात्र चोरटा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.