प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असते. प्रेमासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी अनेक मोठमोठी युद्ध झाली आहेत. प्रेमाच्या उत्कटतेच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण जसा जमाना बदलला तसं प्रेम करण्याची आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धतीदेखील बदलल्या आहेत.

सध्या एका तरुणीने आपल्या प्रियकरासाठी असं कृत्य केलं आहे, ते वाचून तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. गुजरातमधील एका उच्चशिक्षित तरुणीने आपल्या प्रियकरासाठी अत्यंत धोकादायक असं पाऊल उचलंल आहे. ज्यामुळे आता तिची सरकारी नोकरी धोक्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरत येथील वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात शिकणारा एक मुलगा परीक्षेच्या कालखंडातच ट्रीपला गेला होता. तर या मुलाचा पेपर देण्यासाठी त्याची प्रेयसी परीक्षा हॉलमध्ये गेल्याची घटना उघडकीस आली आहे

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
लग्नानंतर होईलच प्रेम : नव्या मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट माहितीये का? मृणाल दुसानिस अन् ज्ञानदाच्या भूमिकेविषयी जाणून घ्या…
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता

हेही पाहा- पाळीव कुत्र्याच्या एका चुकीमुळे घर आगीत जळून खाक; मालकीन हेअर ड्रायर बेडवर ठेवून गेली अन्…

आपण अशी अनेक प्रकरण पाहिली आहेत, जिथे चांगले गुण मिळवण्यासाठी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन डमी उमेदवार म्हणून परीक्षा द्यायला बसवलं जात. मात्र, आता जी तरुणी प्रियकराचा पेपर देण्यासाठी आली होती ती सरकारी नोकरीत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय आपल्या प्रियकरासाठी तिने हा धोका पत्करला खरा, पण आता त्याचे मोठे परिणाम तिला भागावे लागणार आहेत.

प्रियकर डोंगरात, प्रेयसी परीक्षा हॉलमध्ये –

हेही वाचा- ‘घरी बसून वेब सिरीज बघायची आहे…’; ‘या’ कर्मचाऱ्याच्या रजेचा अर्ज का होतोय Viral एकदा पाहाच

परीक्षेदरम्यान, हॉलमधील निरीक्षक दररोज बदलत असतात, त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला ओळखणं सोपं नसतं. याचाच गैरफायदा घेत या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये बी.कॉमच्या तिसर्‍या वर्षाची परीक्षा सुरू असताना या तरुणीने आपल्या प्रियकराच्या प्रवेशपत्रातील नाव आणि फोटो बदलसा आणि ती परीक्षेसाठी गेली. मात्र, तिच्या प्रियकरासोबत परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाला सांगितले की, आज ज्या ठीकाणी मुलगी बसली आहे त्या ठीकाणी मागील पेपरला एक मुलगा बसला होता. या मुलाने पर्यवेक्षकाला सांगितल्यामुळे तरुणीचा भांडाफोड झाला, परीक्षा समितीने तपास केल्यानंतर त्यांनी या तरुणीच्या शिक्षेबाबतची शिफारस विद्यापीठ व्यवस्थापनाकडे केली आहे.

मुलीची नोकरी संकटात –

हेही पाहा- वळू घराच्या छतावर गेला पण खाली यायचा रस्ता सापडेना, संतापून थेट रस्त्यावर उडी मारली अन्…

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रकरणात मुलीची पदवी रद्द होऊ शकते आणि तिची नोकरीही जाऊ शकते. शिवाय तिच्या प्रियकरालाही पुढील ३ वर्षे परीक्षा देण्यापासून रोखलं जाऊ शकते. दरम्यान, तरुणीच्या प्रियकराला परीक्षा समितीसमोर हजर केले असता, त्याने आपण उत्तराखंडला सुट्टी घालवण्यासाठी गेल्याचे कबुल केलं. तर मुलीच्या कुटुंबीयांनी आम्हाला याबाबत काहीच माहिती नसल्याचं सांगितलं आहे. शिवाय हा मुलगा परीक्षेत सतत नापास झाला होता, त्यानंतर त्याच्या जागी त्याच्या प्रेयसीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.