प्रसिद्ध गुजराती लोक गायिका गीता बेनच्या कॉन्सर्टचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरतरं गीता बेनने युक्रेनला मदत करण्यासाठी अमेरिकेत एक कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्टमध्ये तिच्यावर लाखो डॉलर्सचा पाऊस पडला. युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू असताना, जगभरातून त्यांच्या मदतीसाठी लोक निधी गोळा करत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा गीता बेन यांनी अमेरिकेत एक कॉन्सर्ट केला तेव्हा मोठ्या संख्येने तिथे असलेल्या भारतीयांनी त्यांच्यावर डॉलर्सचा पाऊस पाडला. यावेळी अंदाजे $300,000 (२.२८ कोटी) रुपये जमा झाले, जे युक्रेनला दान करण्यात येतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोक गायिकाचा हा कॉन्सर्ट शनिवारी अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गीता बेन रबारी, त्यांचे साथीदार मायाभाई अहीर आणि सनी जाधव यांनी भारतीय आणि गुजराती संगीताची मेहफील रंगवली. गीता बेनने स्वतः च्या कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा : विल स्मिथच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर सलमान खानने केले वक्तव्य, म्हणाला…
आणखी वाचा : या ४ अक्षरांच्या स्त्रिया पतीला बनवतात श्रीमंत, जाणून घ्या त्यांच्याविषयी
गीता बेन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आठवड्याभरापूर्वी त्यांनी टेक्सासमध्ये लाइव्ह कॉन्सर्टही केला होता. याशिवाय रविवारी त्यांनी लुइसविल शहरात लाइव्ह परफॉर्मन्स दिला. हा कॉन्सर्ट सूरत लेवा पटेल समाजाने आयोजित केला होता, ज्यातून ३ लाख डॉलर्स (सुमारे २.२५कोटी रुपये) निधी उभारण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर गीता बेनचे २३ लाख फॉलोवर्स आहेत.