सामान्यपणे व्यक्तीची जितकी उंची असते तितके लांब गुजरातमधील एका तरुणीचे केस आहेत. निलांशी पटेल असे या तरुणीचे नाव असून ती गुजरातमध्ये राहते. तिचे वयही अवघे १६ वर्षे असून इतक्या लहान वयात इतके लांब केस असणाऱी निलांशी कदाचित एकमेव भारतीय असेल. निलांशीच्या केसांची लांबी ५ फूट ७ इंच इतकी आहे. तिच्या याच लांबसडक केसांमुळे तिची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. आता तिचे केस इतके कसे वाढले असतील असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर तिने मागील १० वर्षांपासून केस कापले नाहीत. एकदा केस कापायला गेल्यावर चुकीचा हेअरकट झाल्यामुळे तिने चिडून परत कधीच केस न कापण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने कधीच केस न कापल्याने ते इतके लांब वाढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या या लांबसडक केसांबाबत निलांशी म्हणते, मी सहावीत असताना एकदा हेयरकट करायला गेले होते. तेव्हा तो चुकला आणि मी अतिशय नाराज झाले. तेव्हापासून मी परत कधीच केस न कापण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे माझे केस इतके लांब झाले आहेत. या केसांची काळजी घेणे नक्कीच आव्हानात्मक असणार. त्याबाबत सांगताना ती म्हणते, मी आठड्यातून एकदा केस धुते. ते धुण्यासाठी आणि विंचरण्यासाठी माझी आई मला मदत करते असेही तिने सांगितले. ती म्हणते, लोकांना वाटते मला माझ्या केसांमुळे खूप अडचणी येत असतील. पण असे अजिबात नाहीये. माझ्या इतक्या मोठ्या केसांबरोबरच मी खेळही खेळते. ते माझ्यासाठी लकी चार्म आहेत. इतके लांब असल्याने या केसांची मी वेणी घालते कींवा त्याचा डोक्यावर आंबाडा बांधते असेही ती म्हणाली.