New York Restaurant: आजकाल खाद्यपदार्थांवर अनेक प्रयोग केले जातात. सोशल मिडियावर विचित्र खाद्यपदार्थांच्या प्रयोगाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ओरियो फ्राईड राईस आणि चीज मॅगी अप्पेपासून ते माझा पाणीपूरी आणि फळांचा चहापर्यंत, अनेक विचित्र खाद्य पदार्थांचे प्रयोग आपण पाहिले असतील. हे पदार्थ पाहून लोकांनी कितीही रोष व्यक्त केला तरी मार्केटमध्ये नवनवीन विचित्र खाद्यपदार्थ येतच असतात. आता गुलाबजामवरही असाच विचित्र प्रयोग करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात कॉफीचाही समावेशही केला आहे. तुम्हाला कॉफी आणि गुलाबजाम एकत्र कसे खाणार असा प्रश्न पडत असेल पण न्युयॉर्कच्या एका कॅफेमध्ये गुलाबजाम कॉफी दिली जात आहे. सध्या सोशल मीडियावर ही कॉफी चर्चेत आली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
गुलाबजाम कॉफीचा व्हिडीओ व्हायरल
रेस्टॉरंटमध्ये ऑफिशिअल इस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ही गुलाबजाम कॉफी कशी दिसते हे पाहता येईल. कॅप्शनमध्ये रेस्टॉरंटने सांगितले की, हे थंड पेय आणि गरम पदार्थाचे मिश्रण आहे. Gulab Jamun Latte असे या पेयाचे नाव आहे. हे गुलाब जाम, केशर आणि खव्यापासून बनवलेला एक गोड पदार्थ आहे ज्याचे Latte मध्ये रूपांतर केले आहे.
हेही वाचा – नारळाच्या करवंटी फेकून देऊ नका? तयार करा सुंदर अंगठीचा बॉक्स; पाहा व्हायरल व्हिडीओ
नेटकरी म्हणाले, ही तर सांस्कृतिक क्रांती”
हा व्हिडिओ आतापर्यंत १०० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या कल्पनेला आतापर्यंत अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी कमेंट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हे पेय व्हेगन बनवता येईल का?” असे एकाने म्हटले तर दुसऱ्याने “हे दुग्धजन्य पदार्थांशिवाय करता येईल का? तिसरा म्हणाला, ” ही सांस्कृतिक क्रांती”.