Viral Video : सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ किंवा गाणी व्हायरल होत असतात. सध्या संजू राठोड व प्राजक्ता घाग यांचं गुलाबी साडी हे गाणं चांगलंच ट्रेंड होत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण या गाण्यावर व्हिडीओ रिल्स बनवताना दिसत आहे. सध्या या गाण्याचा आणखी एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. एका सिंगरनी हे गाणं गुजराती व्हर्जनमध्ये गायले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक गुजराती सिंगर त्याच्या गोड आवाजात गुलाबी साडी हे गाणं गुजरातीमध्ये गाताना दिसत आहे. तो एवढ्या सुंदरपणे हे गाणं गातो ती तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. या गाण्याचे लिरिक्स गुजरातीमध्ये सुद्धा ऐकायला भारी वाटत आहे. तुम्हाला गुलाबी साडी हे गाणं गुजरातीमध्ये ऐकायचं असेल तर हा व्हिडीओ पाहा. किशन रावल या गुजराती सिंगरने हे गाणं गायलं आहे तर हे गाणं गुजरातीमध्ये जयेश राजगोरनी लिहिले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : Jugaad Video : उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्यासाठी केला अनोखा जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

kishanravalmusic आणि writer_rajgor_jayesh_1621 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गुजरातीमध्ये गुलाबी साडी” या कॅप्शनमध्ये या गाण्याचे लिरिक्स सुद्धा लिहिलेय. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्राचे प्रोजेक्ट पण गुजरातला आणि आता गाणं पण” तर एका युजरने लिहिलेय, “मस्त ऐकायला मजा आली” आणखी एका युजरने लिहिलेय, “गुजरातीमध्ये छान आहे पण मराठीमध्ये भावना आहे.. लय भारी” अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे तर काही लोकांना मराठी गाणंच आवडले आहे. सध्या या गाण्याची सगळीकडे चर्चा आहे. स्टार्स पासून सामान्य लोक या गाण्यावर रिल्स बनवताना दिसत आहे.

Story img Loader