नवी दिल्ली : सामान्य माणूूस असो की आरोपी, पोलिसांच बोलणं वागणं सारखंच. यामुळे पोलिसांची इमेज वाईट ठरत आहे. हे चित्र बदलण्यासाठी गुडगाव पोलिसांनी नवीन पाऊले उचलली आहेत. नव्या वर्षात आवाज देताना गुडगाव पोलीस ओय नाही तर हाय म्हणणार आहे, पोलीस आयुक्त के.के. राव यांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा आणि नवीन वर्षातील योजनांविषयी के.के. राव यांनी माध्यमांशी संवाद साधला. राव म्हणाले, सर्वसामान्य माणसांशी मैत्रीपूर्र्ण व्यवहार करण्यासंदर्भात पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोलीस ठाण्यांसह ज्या ज्या ठिकाणी पोलिसांचा नागरिकांशी संबंध येतो तेथील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षीत केले जाणार आहे. पोलिसांच्या वागण्याविषयीच जास्त तक्रारी असतात. समूूळ संपविण्यासाठी उपाययोजना तयार केली आहे, असेही राव म्हणाले.
फरार आरोपींची संपत्ती जप्त करणार
गेल्या वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांमधील अनेक आरोपी फरार आहेत. ७८२ इतकी आरोपींची संख्या असून, त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. अशा आरोपींची संपत्ती पोलीस जप्त करणार आहे. महसूल विभागातून त्याच्या संपत्तीची माहिती घेण्याची तयारीही झाली आहे, असे पोलीस आयुक्त के.के. राव यांनी सांगितले.