Guru Purnima 2023 Wishes in Marathi: आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपणाला योग्य दिशा दाखवणारे अनेक गुरु असतात, मग ते अंगणवाडीपासून ते आपण जिथे कामला लागतो तिथपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक लोक असतात, त्यातील काही लोकांना आपण मनापासून गुरु मानतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.
खरं तर, आषाढी पौर्णिमेलाच गुरूपौर्णिमा असेही म्हटलं जातं. धर्मग्रंथानुसार वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे महर्षी वेद व्यास यांच्या जन्मापासून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजेची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. असं म्हणतात की वेदव्यासांनी मानवजातीला सर्वात आधी चार वेदांचे ज्ञान दिले. त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे आशीर्वाद घेण्यासोबतच आपल्या गुरूंना विशेष मेसेज पाठवून तुम्हीदेखील त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करु शकता, शुभेच्छा देऊ शकता.
तुम्हाला गुरुंना पाठवण्यासाठी किंवा व्हाट्सअॅप स्टेटस ठेवण्यासाठीचे शुभेच्छा संदेश –

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश –
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा – Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमा साजरी करण्याचं महत्त्व? जाणून घ्या विधी आणि मुहूर्त ….
गुरू जगाची माऊली, जणू सुखाची सावली गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
होवो गुरु चरणाचे दर्शन, मिळे आनंदाचे अंदन! !
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.