Guru Purnima 2024 Wishes in Marathi: आषाढ पौर्णिमेला गुरूपौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा यावर्षी रविवार, २१ जुलै रोजी आहे. या दिवसाचे महत्त्व हे फारच खास आहे. हा दिवस महर्षी व्यासमुनींचा जन्म दिवस म्हणूनही ओळखला जातो. महर्षी वेद व्यास यांच्या जन्मापासून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजेची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. असं म्हणतात की, वेदव्यासांनी मानवजातीला सर्वात आधी चार वेदांचे ज्ञान दिले. त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. गुरु पौर्णिमा हा शिक्षकांचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित दिवस आहे. 

शाळा, कॉलेज, व्यवसायक्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूंनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे आशीर्वाद घेण्यासोबतच आपल्या गुरूंना विशेष मेसेज पाठवून तुम्हीदेखील त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करु शकता, शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही आपल्या गुरुंना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही दिलेले शुभेच्छा संदेश व व सुंदर ग्रीटिंग्स WhatsApp, FB, Instagram, अशा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करुन त्यांना शुभेच्छा देऊ शकता. पाहा गुरुपौर्णिमेनिमित्त पाठवता येतील असे खास संदेश…

Raksha Bandhan 2024 Marathi wishes
रक्षाबंधनाला लाडक्या बहीण भावाला पाठवा शुभेच्छा! एकापेक्षा एक हटके मेसेज, मराठी शुभेच्छांची लिस्ट एकदा पाहाच
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
20th July 2024 Marathi Rashibhavishya
२० जुलै पंचांग: कुणाच्या घरी बागडेल आनंद, तर कुणाला वापरावी लागेल अधिकार वाणी, मेष ते मीन राशीला शनिवार कसा जाणार?
माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर; तुमचे नाव आहे की, नाही कसे तपासणार? फाॅलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स  
Five common eye infections you should be aware of this monsoon season
पावसाळ्यात डोळ्यांना होऊ शकतो ‘या’ ५ प्रकारचा संसर्ग? कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Cargo ship catches fire off Goa coast; 1 died, explosions heard
गोव्याच्या किनाऱ्यावर मालवाहू जहाजाला आग; एकाचा मृत्यू
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र
“तुम्हाला जिमची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स वापरा’, मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंना पाठवा खास मराठीतून मेसेज आणि शुभेच्छा संदेश

गुरुब्रह्म गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

जगी जीवनात आधी गुरुसी वंदावे,
प्रत्येक सकाळी नाम त्यांचे घ्यावे,
गुरुच मायबाप, नाम घेता हरतील पाप,
तो नसे मोक्षदाता, असे तो मार्गदाता,
मार्ग देई सत्य, अहिंसा आणि शांतीचा…
तोचि आपला गुरू ओळखावा…

ज्यांनी मला घडवलं… ज्यांनी लढायला शिकवलं…
लढता लढता जिंकायला शिकवलं…
जिंकल्यानंतर पाय जमिनीवरच रोवायला शिकवलं..
द्वेष भावनांना बाजूला सारून
माणसाने माणसाशी माणसासम जगायला शिकवलं..
अशा माझ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरू आमची सावली, गुरू आमची माऊली
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरू वसतो चराचर…
कारण तो असतो अखंड वाहणारा झरा…
माझ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु म्हणजे परीस आणि
शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या
गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

अशाप्रकारे तुम्ही शुभेच्छा संदेश देऊन गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करु शकता.