Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या लग्नातील एका गुरुजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गुरुजी नवदाम्पत्यांना भन्नाट सूचना देत आहेत. गुरुजींच्या या भन्नाट सूचना ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, नुकतेच लग्न झालेले नवरा-नवरी एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहून गुरुजी या नवदाम्पत्याला सूचना देत आहेत.

car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
navri mile hitlerla serial new guest coming to the Aj family
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत जहागीरदारांच्या घरी येणार नवी पाहुणी; कोण आहे ती? पोस्टर पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स
Groom bride dance video in there wedding on marathi song video goes viral
VIDEO: “आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” नवरीनं लग्नात केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही झाला लाजून लाल

हेही वाचा : Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा भांडण; तरुणीने एका तरुणाला सटासट लगवाल्या कानाखाली, पाहतच राहिले प्रवासी.! पाहा धक्कादायक व्हिडीओ

गुरुजी सूचना देताना म्हणतात, “निखिलराव, मुलीचे मामा-मामी, आई-वडील आणि बाकीचे सगळे तु्म्हाला सांगतात की, लहानपणापासून ते आजच्या दिवसापर्यंत या मुलीचा जसा सांभाळ झाला, तिचे जे काही हट्ट पुरविले ते तुम्ही आजपासून पुरवायचे. त्यांनी तिला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नसावी. त्यामुळे तुम्हीही या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू द्यायची नाही. साडी मागितली, साडी दे, पिक्चरला घेऊन जा. जसा लक्ष्मीनारायणाचा सुखाने संसार झाला तसा तुम्ही आजपासून सुखाने संसार करायचा. आजपासून संपूर्ण ठाण्यामध्ये रस्त्यावरून चालताना सरळ नाकासमोरून चालायचं. आजूबाजूला कुठे जास्त बघत बसायचं नाही.”

त्यानंतर गुरुजी पुढे म्हणतात, “विनीताबाई, सकाळी ७-८ वाजता घरी कोणी माणूस आला, तर कपाळाला आठ्या पडता कामा नयेत. चहा-नाश्ता बनवून द्यायचा. सासऱ्यांना चहापाणी जे काही लागतं, ते वेळेवर द्यायचं. महिन्याला तुम्ही जे दोघे पैसे कमावताय, ते एक तारखेपर्यंत पुरवायचे. दर महिन्याला नवऱ्याकडे नवीन साडी, आयफोन, असं काहीतरी मागत बसायचं नाही.
“निखिलराव, आजपासून टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप कामापुरतंच वापरायचं. दोघांनी एकमेकांकडे लक्ष ठेवा आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. “या सूचना दिल्यानंतर गुरुजी मामांना सांगतात की, दोन्ही हात वर करा.

हेही वाचा : Optical Illusion : फोटोत जो शब्द तुम्हाला पहिल्यांदा दिसतो, त्यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्त्व

सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. harshaddalviphotography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘आजकालचे गुरुजी’
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ‘माझ्या लग्नात मला हेच गुरुजी हवे आहेत’ तर एका युजरने लिहिले आहे, ‘मला गुरुजी खूप आवडले. एकदम भारी आहेत.’ आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘गुरुजींनी खरं काय ते चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.’ अन्य काही युजर्सनी गुरुजींचा नंबर मागितला आहे.

Story img Loader