Shocking video: नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून जातो. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असतात. काही तर दुसरं लग्नही करतात, सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एका व्यक्ती दुसरं लग्न करत होता यावेळी त्याची पहिली बायको आली अन् पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.
पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्याची कल्पना असून ही काही जण हे उद्योग करत असतात. दुसऱ्या लग्नाचं बिंग फुटू नये म्हणून त्यांच्याकडून खबरदारी देखील घेतली जाते, पण अखेर कधी तरी ते बिंग फुटतं. असंच एका पठ्ठ्यानं केलं मात्र त्याच्या पहिल्या बायकोनं त्याला चांगलाच धडा शिकवला. एक व्यक्ती दुसरं लग्न करत असाताना त्याची पहिली बायको त्याठिकाणी येते आणि थेट लग्नमंडपात गोंधळ घालू लागते. या गोंधळाचं रुपांतर नंतर हाणामारीत होतं. हा गोंधळ इथेच थांबला नाही. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारामारीत वरासह चार जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वराला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारी घेऊन आवश्यक कारवाई सुरू केली आहे. तरुणाच्या पहिल्या पत्नीचा आरोप आहे की, तिचे लग्न दानिशसोबत २०१९ मध्ये झाले होते. त्याला एक मूलही आहे. दानिश दररोज पत्नीला मारहाण करायचा, याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. घटस्फोटही झाला नाही. त्यानंतरही तो दुसरे लग्न करत होता.या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी सतीश सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून वराला ताब्यात घेण्यात आले. दोन्ही पक्षांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?
सोशल मीडियावर @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरु हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.