Good Girl Identify Marriage Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. दोन व्यक्तींच्या आयुष्याची नवी सुरुवात असते, त्यामुळे लग्नासाठी मुलगी किंवा मुलगा बघताना आपल्याला आधी कुटुंबाचा, भविष्याचा विचार करावा लागतो. केवळ बाह्य सौंदर्य पाहून निवड करणे योग्य नाही. जेव्हा तुम्ही मुलगी बघायला जाता, तेव्हा सौंदर्याव्यतिरिक्त तिचा स्वभाव आणि इतर गोष्टींवरदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. कारण- तुमची जोडीदाराची निवड चुकली तर आयुष्यभर तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. हीच गोष्ट लक्षात घेत एका काकांनी लग्नासाठी चोखंदळपणे योग्य मुलगी निवडता यावी यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या याबाबत एक भन्नाट फॉर्म्युला सांगितला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये एका काकांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे चांगल्या मुली ओळखण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला चांगली मुलगी निवडण्यास मदत करू शकेल.

चांगल्या मुलीमध्ये कोणत्या पाच गोष्टी पाहायला हव्यात

व्हिडीओमध्ये काका भोजपुरीमध्ये बोलताना ऐकू येत आहेत. ज्यामध्ये एका व्यक्तीने त्यांना विचारले की, चांगल्या मुलीमध्ये कोणत्या पाच गोष्टी पाहायला हव्यात. यावर काका ‘ABCDE’ असे उत्तर देतात. हे ऐकून ती व्यक्ती त्यांना विचारते की, याचा अर्थ काय? त्यावर काकांनी उत्तर देत ‘ABCDE या फॉर्म्युल्याचा केला आणि त्यातून चांगली मुलगी कशी ओळखायची हे स्पष्ट केले.

यावेळी ABCDE या फॉर्म्युल्याचा अर्थ स्पष्ट करत काका म्हणाले की, A म्हणजे Age, सर्वात आधी मुलीचे वय बघायला हवे. त्यानंतर B म्हणजे Beautiful, मुलींचे सौंदर्य बघायला हवे. C म्हणजे Character, मुलीची जोडीदार म्हणून निवड करण्याआधी तिचे चारित्र्य जाणून घेतले पाहिजे. D म्हणजे Decoration, मुलीच्या शरीराची ठेवण कशी आहे हे समजून घेतले पाहिले. मग शेवटी त्यांनी E म्हणजे Education, मुलगी किती सुशिक्षित आहे हे बघायला हवे, असे बजावून काका तिथून निघून जातात आणि व्हिडीओ इथेच संपतो.

बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO

काकांच्या मते ABCDE फॉर्म्युलाने चांगली मुलगी ओळखता येते, इंग्रजी अक्षरांनुसार अर्थ खालीलप्रमाणे :
A- Age (वय)
B- Beautiful (सौंदर्य)
C- Character (चारित्र्य)
D- Decoration (शरीराची ठेवण)
E- Education (शिक्षण)

हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर @bihar_ekfeel नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट्स करून काकांच्या बोलण्याचं समर्थनही केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guys learn abcde told a new formula to identify good girls for marriage watch this funny video sjr