Gym accident viral video: आयुष्यात कधी कोणावर वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. अनेकदा आपण भयानक अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहत असतो. कधी कोणावर कोणता प्रसंग ओढवेल याची खात्री नसते. या अपघातांमध्ये अनेक जण गंभीर जखमी होतात, तर काही जण आपल्या जीवाला मुकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधी कधी दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे तिसऱ्याचाच बळी जातो. आजच्या काळात अनेकांच्या हातात असूनही ते दुसऱ्यांची मदत करण्यास पुढाकार घेत नाहीत आणि फक्त बघ्याची भूमिका साकारतात. पण, या सगळ्या गदारोळात कुठेतरी अजूनही माणुसकी शिल्लक आहे. स्वत:ची पर्वा न करता अजूनही काही लोक दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जातात. यावेळी जणू देवच माणसाच्या रुपात आला असं अनेकांना वाटतं.

हेही वाचा… हद्दच झाली! रीलसाठी तरुणाने सायकलस्वार वृद्धाच्या चेहऱ्यावर मारला स्प्रे अन् पुढच्याच क्षणी…, VIDEO पाहून बसेल धक्का

दुसऱ्यामुळे कोणाचा जीव वाचला तर त्या व्यक्तीला मिळालेलं हे जीवनदानच आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकताच असाच काहीसा प्रसंग एका ठिकाणी घडला, जिथे एक मोठा अपघात होता होता वाचला.

असं म्हणतात ना, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ याचाच प्रत्यय अलीकडच्या एका घटनेत आला, ज्यात एका तरुणाच्या अंगावर भलामोठा डंबेल पडता पडता वाचला. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओत एका जिममध्ये एक अपघात होता होता वाचतो. जिममध्ये एका ठिकाणी बसलेल्या माणसावर अचानक डंबेल पडणार इतक्यात एक माणूस तो झेलतो आणि मोठा अनर्थ होण्यापासून टळतो. जिममधील डंबेल त्या तरुणावर पडण्याआधी देवासारखा धावून आलेला हा माणूस काही कारणासाठी तेथे येतो.

हा व्हिडीओ @viralinmaharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “देव कोणत्या रुपात येतात ते सांगता येत नाही” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… अरेरे! कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, VIRAL VIDEO पाहून कपाळावर माराल हात

व्हायरल व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खरंच देव कोणत्या रुपात धावून येईल हे काही सांगता येत नाही.” तर दुसऱ्याने “तरुणाचे प्राण वाचवल्याबद्दल त्या माणसाला सलाम” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “देव तारी त्याला कोण मारी, यावरून हेच समजतं की जिममध्ये सेफ्टी खूप गरजेची आहे.”

दरम्यान, याआधीही जिममध्ये अशा अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत, ज्यात अनेक जण जखमी झाले आहेत. याआधी संभाजीनगरमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना एका व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gym accident a dumbbell fell on a person viral video on social media dvr