डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर तिथल्या समाजात दोन तट पडले आहेत हे तर आता निश्चितच आहे. एकीकडे ट्रम्प यांच्या कट्टर विचारसरणीला पाठिंबा देणारा तिथला समाज तर दुसरीकडे हिलरी क्लिंटन यांना ट्रम्पपेक्षा तीस लाख मतं जास्त मिळूनही त्यांना अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होता न आल्याने ट्रम्पवर भयंकर चिडलेला तिथला उदारमतवादी विचारांचा समाज. या दोन्ही गटांमध्ये सगळ्या माध्यमांमधून एकमेकांशी मारामारी सुरू असते.
आता याचबाबतीत एक मजेशीर प्रकार घडला आहे. जगभरातली प्रसिध्द फास्टफूड चेन ‘मॅकडाॅनल्ड्स’चं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं आणि त्यानंतर या अकाऊंटवर ‘डोनाल्ड ट्रम्प तुम्ही अत्यंत फालतू राष्ट्राध्यक्ष आहात, आम्हाला बराक ओबामा परत हवे आहेत. आणि तुमचे ‘हात’ खूप लहान आहेत’ असं ट्वीट पडल्याने सगळीकडे हलकल्लोळ उडाला आणि नेटयूझर्सची हसून पुरेवाट झाली.
पाहा हे ट्वीट
मॅकडाॅनल्ड्ससारख्या प्रख्याक फास्टफूड चेनचं अकाऊंट हॅक होत त्यावरून थेट अमेरिकन अध्यक्षांची अशी खेचली जावी यामुळे सगळीकडे हास्यकल्लोळ झाला. ट्रम्प यांच्या विरोधकांनी मॅकडाॅनल्ड्सचीच टॅगलाईन वापरत ‘आय अॅम लव्हिंग इट’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मॅकडाॅनल्ड्सच्या या हॅक्ड अकाऊंटवर मॅकडाॅनल्ड्सने लगेचच ताबा मिळवला आणि आपलं अकाईंट हॅक झालं असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हे कसं झालं याबद्द आम्ही चौकशी करणार असल्याचं मॅकडाॅनल्ड्सने ट्वीट करत स्पष्ट केलं.
Twitter notified us that our account was compromised. We deleted the tweet, secured our account and are now investigating this.
— McDonald’s (@McDonaldsCorp) March 16, 2017
सौजन्य- ट्विटर
पण यानिमित्ताने झालेल्या गोंधळामुळे ट्रम्पविरोधकांची जबरदस्त करमणूक झाली.
[jwplayer gyd5k1ZL]