सोशल मीडियावर काही असे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे थेट मनात बसतात. असे व्हिडीओ पाहून काही लोक तर भावूक सुद्धा होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. दर महिन्याला एकदा का होईना आपलं न्हाव्याकडे जाणं हा काहींचा नित्यक्रमच बनलेला असतो. नेहमीप्रमाणे आपण त्याच्याकडून आपले केस कापून येतो. पण सध्या व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात न्हाव्याकडे केस कापण्यासाठी आलेल्या ग्राहकाला एक वेगळाच अनुभव मिळाला. या व्हिडीओमध्ये हेअरड्रेसर आपल्या ग्राहकांच्या कपाळावर चुंबन घेताना दिसतोय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ प्युबिटी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मूळतः ब्रायन नावाच्या हेअरस्टायलीस्टने शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ब्रायन आपल्या ग्राहकांना त्यांच्या कपाळावर गोड चुंबन देताना दिसत आहे. ब्रायनच्या या चुंबन घेण्यावर कोणाचीच हरकत नव्हती आणि उलट त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल देताना दिसून येत आहेत. त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या कपाळावर तो किस करताना दिसतोय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेवताना अचानक घास घशात अडकला, हॉटेलच्या महिला वेटरने वाचवला जीव
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ आता लोक मोठ्या प्रमाणात शेअऱ करू लागले आहेत. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ११ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८ लाख ४९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.