Viral Video: यंदा नवरात्र उत्सवाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला. आज नवरात्रीचा अखेरचा दिवस असून आजचा रंग मोरपिसी आहे. उद्या नवरात्र उत्सवाची समाप्ती होईल. या दरम्यान नवरात्रीत सार्वजिक मंडळांकडून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी चित्रकला, बेस्ट डान्सर, फॅन्सी ड्रेस अशा स्पर्धांचे आयोजन देवीच्या मंडपात करण्यात येते. तर या स्पर्धेत अनेक जण आवर्जून भाग घेतात आणि विविध वेशभूषा करून नवरात्रीत गरबा करत सहभागी होतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात दोन व्यक्ती अगदीच अनोखी वेशभूषा करून नवरात्री खेळण्यास सज्ज आहेत.
हॅलोवीन (Halloween) भारतामध्ये काही मोजकेच लोक साजरा करतात. तर आज गरबा आणि हॅलोवीन हे एकत्र साजरे करण्यात आले असून एक अनोखं दृश्य पहायला मिळाले आहे. व्हायरल व्हिडीओ गरब्याचा आहे. गरबा खेळण्यासाठी दोन तरुण द नन (The Nun) चित्रपटातील भयावह पात्राची वेशभूषा करून आले होते. चित्रपटातील पात्राप्रमाणेच दोन व्यक्तींनी काळ्या रंगाचे कपडे, चेहऱ्याला पांढरा रंग लावून, हातात पांढरे मोजे, ओठांना व डोळ्यांना काळा रंग लावून तो पसरवून हा खास लूक केला आहे. द ननची वेशभूषा करून आलेल्या दोन व्यक्तींचा खास गरबा एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
हेही वाचा…“प्रॉपर्टी फक्त माझी आहे” चिमुकलीचं आत्याबरोबर मोठं भांडण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :
‘द नन’ या चित्रपटाची कथा अगदी सगळ्यांनाच घाबरवून सोडणारी आहे. ही कथा एका तरुण ननची आहे. या कथेदरम्यान चित्रपटात अनेक भीतीदायक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. तर हॅलोवीनमध्येसुद्धा अनोख्या आणि भीतीदायक वेशभूषा केल्या जातात. या दोन गोष्टींना एकत्र करून काही तरुण गरबा खेळण्यासाठी आले आहेत. गरबा खेळताना दोन तरुण द ननची वेशभूषा करून आले आणि गरबा खेळताना दिसले. रंगीबेरंगी चनियाचोळी आणि पारंपरिक ड्रेस घातलेल्या अनेक लोकांमध्ये हे दोन तरुण हॅलोवीनमध्ये जसे तयार होतात तसे द ननची वेशभूषा करून आले आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @desimojito या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला हॅलोवीन गरबा? (Halloween Garba?) असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडीओ गरबा खेळणाऱ्या एका व्यक्तीने शूट केला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आतापर्यंत तुम्ही गरबा खेळताना नऊवारी साडी, पोलिस, चोर किंवा आणखीन काही वेशभूषा करून आलेल्या अनेकांना पाहिलं असेल. पण, द ननची वेशभूषा करून या व्यक्तींनी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतले आहे.