अंकिता देशकर

Hamas Terrorist Kidnap Little Girl Video: लाइटहाऊस जर्नलिझमला एका लहान मुलीसह एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. व्हिडिओसह असा दावा करण्यात आला होता की हा माणूस हमासचा दहशतवादी होता ज्याने एका ज्यू मुलीचे अपहरण केले. मूळ व्हिडीओचे अरबी कॅप्शनचे भाषांतर ‘एक हरवलेली मुलगी’ असे असल्याचे सुद्धा व्हायरल पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. सध्या जगभरात तापलेल्या इस्त्रायल- पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे, अनेकजण हा व्हिडीओ शेअर करताना हळहळ व्यक्त करत आहेत. पण आमच्या तपासात या व्हिडिओची खरी बाजू सुद्धा समोर आली आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
Medhansh Trivedi build single seater drone copter
आता चक्क माणसाला घेऊन हवेत उडणार ड्रोन; विद्यार्थ्याचे जबरदस्त इनोव्हेशन पाहून Anand Mahindra ही झाले चकित; म्हणाले…
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Faraz Pervaiz ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल ला शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आमच्या तपासाची सुरुवात आम्ही पोस्ट वरील कमेंट वाचण्यापासून केली. काही कमेंट्स मध्ये नमूद केले आहे की हा एक जुना TikTok व्हिडिओ आहे आणि दिसत असलेली मुलगी खरोखरच हरवली होती.

अनेकांनी फेक न्यूज शेअर करण्यासाठी वापरकर्त्याला कमेंट सेक्शन मध्ये चांगला चोप दिला. या पोस्ट च्या कमेंट सेक्शन मध्ये बऱ्याच लोकांनी या व्हिडिओ चे इंग्रजीत ट्रान्सलेशन देखील दिले होते.

त्यात तो माणूस मुलीला विचारताना दिसतो, “तू कोणासोबत आलीस?” आम्ही या व्हिडिओ वरील वॉटरमार्क तपासला, तो एका टिकटॉक यूजर चा होता, त्यात @izzeddin_masama असे युजरनेम नमूद केले होते. आम्हाला हे प्रोफाइल टिकटॉक वर सापडले, पण भारतात टिकटॉक बॅन असल्याकारणाने आम्ही या व्हिडिओचा मजकूर वाचू शकलो नाही. पण हे नक्की आहे की हा व्हिडिओ सप्टेंबर मध्ये अपलोड करण्यात आला होता.

https://www.tiktok.com/@izzeddin_masama/video/7276523193580391682

आम्ही हा व्हिडिओ आणि आमचा तपास, बांगलादेश मधील फॅक्ट चेकर तन्वीर मेहताब अबीर यांच्यासह शेअर केला. त्याबद्दल तन्वीरने टिकटॉक वर तपास करत आम्हाला सांगितले, की टिकटॉक यूजरने हा व्हिडिओ ९ सप्टेंबर, २०२३ रोजी अपलोड केला होता. एका लहान मुलीचे व्हिडिओ अपलोड केले म्हणून या यूजरला बऱ्याच लोकांनी कमेंट सेक्शन मध्ये सुनावले होते. म्हणून या यूजरचे अकाउंट सध्या बंद आहे.

हे ही वाचा<< इस्रायलचे हेलिकॉप्टर पाडले? पॅलेस्टाईनमधून पॅराशूट घेऊन आले अन्.. युद्धाचे म्हणून Video शेअर करताना नीट बघा

निष्कर्ष: अपहरण झालेल्या ज्यू मुलीचा असल्याचा दावा केलेला व्हायरल व्हिडिओ सध्याच्या इस्रायल-गाझा युद्धाशी संबंधित नाही. व्हायरल दावा खोटा आहे.

Story img Loader