सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही मजेशीर असातत, तर काही आपणाला आश्चर्यचकीत करणारे. तर काही काही व्हिडीओ असे असतात जे आपल्या मनाला भावतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील मुलगी अपंग असून ती भारतीय आहे, जिला एका अमेरिकन कुटुंबाने दत्तक घेतले आहे. या लहान मुलीला भारतीय खाद्यपदार्थ दिसताच ती असं काही करते, जे पाहून तुम्हीही भारावून जालं. खरं तर आपण आपल्या कुटुंबापासून दूर गेल्यानंतर घरातील जेवणाची किमंत कळते, असंच काहीसं या मुलीबरोबर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय खाद्यपदार्थ पाहताच मुलीचा आनंद गगनात मावेना

व्हिडीओतील मुलीला अमेरिकेत नेल्यानंतर तिच्या दत्तक पालकांनी तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालण्यासाठी एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये नेल्याचं दिसत आहे. शिवाय अमेरिकेत गेल्यानंतर तिला अनेक दिवसांपासून भारतीय खाद्यपदार्थ खायला मिळालं नसल्याचा अंदाज व्हिडीओ पाहिल्यानंतर येत आहे. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये टेबलवर भारतीय पद्धतीचे जेवण येताच मुलीच्या आनंदाला पारावार उरत नाही. त्यामुळे जेवणाचे ताट पाहताच ती बसलेल्या जागेवरुन उठते आणि उभी राहते मोठ्याने हातवारे करु लागते, शिवाय ते जेवण खाण्यासाठी ती खूप आतुर झाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- फायर शॉट दारू पिणं तरुणाच्या अंगलट, चेहऱ्याला आग लागली अन्…, घटनेचा VIDEO व्हायरल

मुलीला कानाने ऐकू येत नाही –

मुलीला दत्तक घेणाऱ्या कुटुंबाने सांगितलं, “आम्ही आमच्या मुलीला भारतातून दत्तक घेतले आहे. अमेरिकेत येण्यापूर्वी आम्ही तिला ६ जणांचे कुटुंबात वाढवले. आम्ही घरी भारतीय जेवण बनवतो पण नुकतेच आम्ही तिला अमेरिकेतील भारतीय रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो होतो. तिथे तिने भारतातून आल्यापासून अशी थाळी पाहिली नव्हती, त्यामुळे आपल्या देशातील खाद्य पदार्थ पाहून ती खूप उत्साहित झाली. तिला ऐकू येत नाही, मात्र ती न बोलताही तिच्या भावना व्यक्त करते.”

“भारतीय अन्न ही एक भावना आहे”

मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जणू तिला सर्वोच्च आनंद मिळाल्याचा भास होत आहे. हा व्हिडिओ लॅडबिबल या परदेशी वेबसाइटने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आनंदाने उड्या मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “धन्यवाद दत्तक घेतल्यानंतरही भारतीय खाद्यपदार्थ लक्षात आहेत, भारतीय जेवण अप्रतिम आहे यात कोणतीही शंका नाही.” तर दुसर्‍याने लिहिले, “कधी कधी संपत्तीपेक्षा अशा छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. भारतीय अन्न ही एक भावना आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handicapped girls joy goes viral when she sees indian food in america adopted girls heartwarming video goes viral jap
Show comments