संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो पण जो कितीही संघर्ष असला तरी संकटांवर मात करून जो आयुष्य आनंद जगता आले पाहिजे. एकीकडे काही लोक सर्व काही असूनही संसाराच्या छोट्या-छोट्या समस्यांमुळे आपल्या आयुष्याला कंटाळतात तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे अनेक संकटाचा सामना देऊनही आयुष्य आनंदाने जगतात. असे लोक आयुष्य जगण्याची वेगळी व्याख्या तयार करतात लोकांना प्रेरणा देतात. नुकताच असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो आयुष्य जगण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला दाखवतो आहे. व्हिडिओमध्ये दोन दिव्यांग मजूर आपल्या कष्ट करून पैसे कमावताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून काही लोक भावूक होत आहेत. काही लोक या व्हिडिओतून खूप प्रेरणा मिळते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


व्हिडिओमध्ये दोन दिव्यांग मजूर खूप मेहनत करताना दिसत आहेत, जे पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. दिव्यांग असूनही ते धैर्याने आणि हिंमत्तीने आयुष्य जगत आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की, सामान्य माणसांप्रमाणेच तेही आपले घर चालवण्यासाठी खूप कष्ट करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक त्याच्या धैर्याला सलाम करत आहेत. अनेकजण भावूकही होत आहेत. व्हिडिओमध्ये दोन्ही दिव्यांग कामगार कुबड्यांच्या सहाय्याने चालत आहे. एक काम कुबडीमध्ये एक पाय अडकवून उभा आहे आणि जमिनीवरील माती टोपलीत भरून दुसऱ्याच्या डोक्यावर देत आहे. दुसरा व्यक्तीने एका हाताने कुबडी पकडली आहे आणि त्याने दुसऱ्या हाताने डोक्यावर मातीने भरलेली टोपली पकडली आहे आणि नंतर तो उचलून मशीनच्या आत नेऊन ती माती टाकतो.

हेही वाचा – Boycott Maldives का होतेय ट्रेंड? पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर भारतीयांनी का रद्द केला मालदीव दौरा

हेही वाचा – रस्त्यावरून धावणाऱ्या कारमध्ये उभी राहून नाचतेय तरुणी; Video Viral पाहून नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद

हा प्रेरणादायी हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. लोक सोशल मीडियावर @dilsarkaria नावाच्या अकांउटवर शेअर केला आहे. फक्त २५ सेंकदाच्या या व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भीक मागून स्वत:ला लाचार करणार नाही. दिव्यांग आहे पण मी कमावून खाऊ शकतो” हा व्हिडीओ आतापर्यंत १ मिलियन लोकांना पाहिला आहे. तर १७ हजार पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. व्हिडीओ पाहून लोक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने लिहिले की, “बेरोजगार लोक फक्त कारण देत राहात आणि ओरडत राहतात की बेरोजगार आहे. हा व्हिडीओ त्यांनी पाहिला पाहिजे आणि काम केले पाहिजे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handicapped labour man working video viral people got emotional snk
Show comments