अंकिता देशकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Hanging Bridge Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये लोक गर्दीने गच्च भरलेल्या पुलावर उभे असल्याचे दिसून येते. हा झुलता पूलही धोकादायक वाटतो आहे. या व्हिडीओसह अनेकांनी गर्दीवर टीका करत “लोकं गर्दी करतात आणि नंतर दुर्घटना झाली तर इंजिनिअरला दोष देतात.” असे कॅप्शन दिले आहे. नेमका हा पूल कुठल्या ठिकाणचा आहे आणि हे प्रकरण काय हे आता लाईटहाऊस जर्नालिज्मच्या तपासात समोर आले आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Sanatani Hindu सनातनी हिंदू ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर ट्विटर यूजर्स देखील हि पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इन्व्हिड टूल मध्ये हा व्हिडिओ अपलोड करून शोधण्यापासून तपासाची सुरुवात केली. इन्व्हिड द्वारे आम्हाला विविध कीफ्रेम्स आढळून आल्या आणि या फ्रेम्सवर एकामागून एक गूगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता आम्हाला stuff.co.nz या वेबसाईट वर एप्रिल २३, २०२१ रोजी अपलोड केलेले एक आर्टिकल सापडले.

https://www.stuff.co.nz/travel/travel-troubles/124928748/watch-rickety-bridge-sways-dangerously-as-hundreds-of-tourists-walk-across-in-nepal

या लेखात घटनेचा व्हिडीओ देखील आहे. लेखात म्हटल्यानुसार, नेपाळी नवीन वर्षाच्या वेळी मंदिरात जाण्यासाठी भाविकांनी १४ एप्रिल रोजी काठमांडूच्या पूर्वेकडील सांगा प्रांतातील रिकेटी पुलावर गर्दी केली. आम्हाला इतर लेखांमध्ये व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट देखील सापडले.

https://viralpress.com/26105/wooden-cable-bridge-sways-dangerously-as-hundreds-of-tourists-walk-across-in-nepal

आम्हाला या पुलाचा अजून एक व्हिडिओ सापडला.

असाच एक व्हिडिओ आम्हाला युट्युब शॉर्ट वर अपलोड केल्याचे आढळले.

आम्हाला ‘सांगा झुलता पुलाचा’ व्हिडिओ देखील सापडला जो व्हायरल व्हिडिओशी साधर्म्य दर्शवणारा आहे.

आम्ही नेपाळमधील फॅक्ट चेकर प्रवीण भट्ट यांच्याशीही संपर्क साधला. व्हायरल व्हिडिओ नेपाळचा आणि Saga Jholunge Pul (साँगा झोलुंगे पुल) येथील असल्याची पुष्टीही त्यांनी केली. उपलब्ध माहितीचा वापर करून आम्ही गूगल मॅप्सवर झुलता पूल शोधला आणि झुलत्या पुलाचे स्थान सापडले. हे प्रवीण भट्ट यांनी आम्हाला दिलेल्या जागेच्या सारखेच होते.

हे ही वाचा << मणिपूर हिंसाचाराचा नवा Video झाला लीक? लोकांनी व्यक्त केला प्रचंड संताप, सत्य समोर आलं आणि…

निष्कर्ष: भारतातील असल्याचा दावा केलेल्या गर्दीच्या झुलत्या पुलाचा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात नेपाळचा आहे आणि व्हिडिओ जुना आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hanging bridge viral video heart beat skips looking at huge crowd netizens say this is why accidents take place svs