सोशल मीडियावर तुम्हाला रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यामध्ये लहान मुलांचे मजेशीर व्हिडीओ देखील असतात. लहान मुलं इतकी गोंडस असतात त्यांचे व्हिडीओ पाहायला देखील अनेकांना आवडेत. सध्या अशाच एका गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली तिच्या बोबड्या बोलीमध्ये चक्क हनुमान चालिसा म्हणताना दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेमध्ये आहेत.
इंस्टाग्रामवर littleKuKu या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या आईबरोबर हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रयत्न करते आहे. तिला अजून स्पष्ट उच्चारही करता येत नाही तरी तिला हनुमान चालिसा म्हणू शकते असा आत्मविश्वास आहे. कारण तिची आई तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण ती मदत घेत नाही. उलट आईलाच म्हणते, ”तू सांगू नको, आज मीच स्वत:ला सांगणार आहे” लोकांना तिच्या या आत्मविश्वासाचे आणि ज्या पद्धतीने ती आईला सांगते याचे कौतूक वाटत आहे. त्यानंतर ती हात जोडून बोबड्या बोलीत हनुमान चालिसा म्हणते. चिमुकलीचे उच्चार स्पष्ट नसले तरी तिला हनुमान चालिसा बऱ्यापैकी पाठ आहे दिसते. तिच्या बोबड्या बोलीत हनुमान चालिसा ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसून मात्र नक्कीच येईल.
हेही वाचा – नारळाचं झाड कसं लावावं? जाणून घ्या सोपी पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा – खोबऱ्यासाठी नारळ आपटून वैतागलात? नारळ फोडण्याची ‘ही’ सोपी पद्धत एकदा वापरून पाहा
व्हायरल व्हिडीओ कित्येकजणांना आवडला आहे आणि अनेकजण त्यावर कमेंट करत आहे. एकजण म्हणाला, तिची भावना तिच्या उच्चारांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.” दुसऱ्याने सांगितले, शब्द भले ही शुद्ध ना हो, पण मुलीची भावना तिच्या वयानुसार पाहा आणि त्यांची भावना अधिक वेगळी आहे.” तर तिसरा म्हणाला की, हिचा गोंडसपणा पाहून देवच खाली येईल. ”