आनंद…आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहायचं असतं पण कित्येकांना आनंदी राहता येत नाही. आपल्या समोर असणार्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा असतो पण अनेकदा आपण त्याकडे दु्र्लक्ष्य करतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता आला पाहिजे मग तुम्हाला जे आवडतं ते करा, डान्स करा, गाणी म्हणा, गप्पा मारा, फिरायसा जा, आवडते पदार्थ खा….फक्त छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद घ्या. अशाच आयुष्याचा आनंद घेणाऱ्या आजी आजोबाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
म्हातारपण हे एक बालपण असतं असे म्हणतात. जस जस वय वाढत जाते तसे वृद्ध लोक अगदी लहान मुलांप्रमाणे वागतात असे म्हणतात. हेच दर्शवणारा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ एका वृद्धाश्रमातील आहे. व्हिडीओमध्ये आजी-आजोबा तांबडी चामडी गाण्यावर आनंदाने नाचताना दिसत आहे. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने नाचत आहे आणि मज्जा करत आहे. नाचता येत नसले तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाचण्याचा आनंद दिसत आहे. उपस्थित लोक टाळ्या वाजवून आजी-आजोबांनाचा उत्साह वाढवत आहेत. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले आहे.
हेही वाचा –फक्त १५ रुपये भाड्याने मिळाली सिंगल रुम! Viral Videoमध्ये तरुणाचा दावा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर shantai_second_childhood नावाच्या पेजवर शेअर आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की कोणीही मॅच करू शकत नाही अशी वाईब”(Vibes none can matc). व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे, नेटकऱ्यांनी आजी -आजोबांच्या डान्सचे आणि त्यांच्या उत्साहाचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले की, “मजामस्ती करण्याचं कोणतं वय नसतं”
दुसरा म्हणाला, “आजींनी किती सोप्या स्टेप केल्या, काय वाईब आबे, आज तुमचं गाणं लावलं होते, एकदम भारी”
तिसरा म्हणाला, “सर्वात गोंडस व्हिडीओ”
चौथा म्हणाला की,”वृद्ध लोकांबरोबर आनंदाने राहायचे सोडून आजची तरुण पिढी त्यांना फोनमध्ये रेकार्ड करण्यात व्यस्त आहे”