Viral video: लेक माहेराच सोनं, लेक सौख्याच औक्षण, लेक बासरीची धूण, लेक अंगणी पैंजण…मुलींना परकं धन समजलं जातं, कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण आईवडीलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचे अंतकरण जड होते. मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होतं. मात्र यामध्ये जर मुलीला तिला हवं तसं तिच्या मनासारखं सासर भेटलं तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं सांगून जातो. अशाच एका नवरीचा लग्नातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजकाल ऐकायला मिळणाऱ्या उदाहरणांवरून लग्नव्यवस्थाच मुलींच्या गळ्याचा फास बनत चालली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. जगभरात सासरच्या जाचाला बळी पडणाऱ्या नवविवाहित मुलींचा आकडा दिवसेंदिवस भयावहरीत्या वाढतच चालल्याचं दिसून येतंय. मुलीस सरकारी नोकरी असावी, घराण्यास वारसदार मुलगाच पाहिजे अशा अटी, तसेच मुलींकडून पैसा व चीजवस्तूंची मागणी करणारी जीवघेणी हुंडापद्धती ही सर्व त्यामागची कारणं आहेत. त्यामुळे मुलींना जीवन नकोसं होतं आणि त्या आत्महत्येस प्रवृत्त होतात. किंवा सासरची मंडळीही कधी कधी त्यांचा जीव घेण्यासही मागे-पुढे बघत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीत मुलींवर सहनशीलतेचे संस्कार केले जातात. त्यांना छोट्या-मोठ्या कारणांकडे कानाडोळा करून, संसार टिकवून ठेवण्यास प्रवृत्त केलं जातं. मात्र हा व्हिडीओ पाहून प्रत्येक मुलगी इतकीच खूश असावी असं नेटकरी म्हणत आहेत.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरी लग्नाच्या मंडपात बसले आहेत. यावेळी नवरी इतकी आनंदी आहे की, तिच्या चेहऱ्यावरुनच कळतंय की नवरीला मनासारख्या नवऱ्यासोबतच मनासारखं सासरही मिळालं आहे. सहसा नवरी लग्नात नरवस असते किंवा घाबरलेली असते मात्र ही नवरी नवरदेवासोबत गप्पा मारताना मनसोक्त हसताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “नशिबापुढे मेहनतीचंही नाही चाललं” अवघ्या २ सेकंदात ‘या’ मुलासोबत जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही

सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_weddingz नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”.

Story img Loader