Heart Attack During Marriage: हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हृदयविकाराशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कुठे तो जेवण करत होता, कुठे नाचत होता तर कुठे जिममध्ये त्याला अचानक हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले, अशा घटना समोर आल्या आहेत. पण साता जन्माच्या शपथा घेत असतानाच जोडीदाराने साथ सोडून जगाचा निरोप घ्यावा याहून दुर्दैव काय असेल. पाकिस्तानमधील नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात काही मिनटांत आनंदाचं रुपांतर दु:खात झालं असल्याचे दिसत आहे. 

नेमकं काय घडलं?

पाकिस्तानमधील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो सियालकोटमधील एका लग्नाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिओ न्यूजनुसार, हा व्हिडिओ सियालकोटच्या डस्का तहसीलचा आहे. या व्हिडिओमध्ये वधू-वर सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला कुटुंबीयही बसलेले दिसत आहेत. आनंदी वातावरण आहे आणि सर्वजण मौज मजा मस्ती करताना दिसत होते. अचानक त्यांच्या आनंदाचे दुःखात रुपांतर होते. ही घटना रविवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”

व्हायरल व्हिडिओमध्ये, सोफ्यावर बसलेला नवरदेव अचानक आपले डोके हळू हळू गुडघ्याकडे टेकताना दिसतोय. बाकीचे आजुबाजुला बसलेले लोकं गप्पा मारण्यात मग्न होते. नवरदेवाकडे काही मिनिटे कोणाचेच लक्ष नसते. काही मिनिटांनंतर लोकांचे त्याच्याकडे लक्ष जाताच काय झालं म्हणून त्याला उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याचा श्वास तिथेच थांबला. तेथे उपस्थित असलेल्या एका वैद्यकीय तज्ज्ञाने त्याची तपासणी केली असता, नवरदेवाच्या हृदयाचे ठोके बंद झाले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण मांडवात शोककळा पसरली. वधूला तर याने धक्काच बसला. ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं स्वप्न तिने पाहिलं होतं तो मांडवातच सारं अर्धवट सोडून जगातून निघून गेला. 

(हे ही वाचा : “मागे बघ…”, शेजारी दोन विषारी सापांची झुंज अन् व्यक्ती गोल्फ खेळण्यात व्यस्त, व्हिडिओ पाहून धराल डोकं )

पाहा व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा जागीच मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. कुटुंबीयांनीही चौकशी किंवा तक्रार करण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Story img Loader