Happy Diwali 2022 Marathi Wishes: करोनाच्या अंधारातून मुक्त होऊन आता दोन वर्षांनी दिवाळी सण पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दिवाळीसाठी सर्वत्र धामधूम पाहायला मिळतेय. कंदिलाच्या रोषणाईने देशभरातील रस्ते उजळून निघाले आहेत. यंदा दिवाळी निमित्त तुम्हाला काही हटके करायचं असेल तर त्याची सुरुवात ही दिवाळीच्या शुभेच्छांपासून करू शकता. दरवर्षी पहिला दिवा लागे दारी किंवा उटण्याचा सुगंधाने उजळून निघे सृष्टी वैगरे तेच तेच दिवाळीच्या शुभेच्छांचे मॅसेज व ग्रीटिंग पाहून तुम्हीही कंटाळला असाल, हो ना? मग यंदाच्या दिवाळीत तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या मराठमोळ्या मजेशीर दिवाळी शुभेच्छा एकदा नक्की पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीच्या दिवशी तुम्हाला शोधाशोध करायला लागू नये यासाठी तुम्ही आजच ही दिवाळीची शुभेच्छापत्रे डाउनलोड करून ठेवू शकता, तसेच तुमच्या इतरही मित्र मैत्रिणींसह शेअर करून त्यांचाही वेळ वाचवू शकता. दिवाळीच्या दिवशी व्हाट्सऍप स्टेटस, इंस्टग्राम, फेसबुकसह तुम्ही वापरत असणाऱ्या सोशल मीडियावरून ही ग्रीटिंग्स शेअर करायला विसरु नका

दिवाळीच्या मराठी शुभेच्छा

फराळाला या आणि येताना डबे भरून आम्हालाही फराळ आणा, वाट पाहतोय!
दिवाळीच्या शुभेच्छा!

Happy Diwali 2022 Marathi Wishes

ही दिवाळी आपणास सुख समृद्धीची ठरो,
तुमचा पगार वाढू दे, आम्हाला पार्टी मिळू दे
दिवाळीच्या खूप शुभेच्छा!

Happy Diwali 2022 Marathi Wishes

चिवडा चकलीसारख्या मित्रांना,
लाडू करंजीसारख्या गोड शुभेच्छा!
शुभ दीपावली!

Happy Diwali 2022 Marathi Wishes

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
शुभ दीपावली!

Happy Diwali 2022 Marathi Wishes

दिव्याप्रमाणे तुमचे आयुष्य उजळून जावे ही सदिच्छा
तुम्हाला व कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Diwali 2022 Marathi Wishes

यंदा दिवाळी ही अवघ्या दोन दिवसातच समाप्त होत आहे पण म्हणून उत्साह कमी होऊ देऊ नका, तसेच तुमचे दिवाळीचे फोटो व खास क्षण आमच्यासह शेअर करण्यासाठी लोकसत्ताच्या लोकोत्सव पेजला आवर्जून भेट द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy diwali 2022 wishes in marathi free download deepawali hd images greetings whatsapp status instagram svs