दिवाळी हा सण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्या देशासोबत देशाबाहेरही दिवाळी तितक्याच उत्साहात साजरी करण्यात येते आणि आलीही. करोनच संकट सावरत आहे. करोनासारख्या धोकादायक साथीतून सावरल्यानंतर यंदाच्या दिवाळीत जगभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावून दिवाळी साजरी केली. याचा फोटो व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आणि लिहिले की, “दिवाळी आपल्याला अंधारातून शहाणपणा आणि सत्याकडे, विभाजनाकडून एकतेकडे आणि निराशेकडून आशेकडे जाण्याची आठवण करून देते. अमेरिका आणि जगभरात दिवाळी साजरी करणार्‍या सर्व हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मियांना पीपल्स हाऊसकडून दिवाळीच्या शुभेच्छा.”

( हे ही वाचा: सिंहासोबत व्हिडीओ काढण्यासाठी त्याने बसची खिडकी उघडली अन्…)

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून व्हिडीओ ट्विट केला आणि म्हटले की अमेरिका आणि जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सर्व लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून व्हिडीओ ट्विट केला की यूके आणि जगभरातील दिव्यांचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

( हे ही वाचा: याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला )


द ओबामा फाऊंडेशन ट्विटर हँडलवरून बराक ओबामांचा फोटो ट्विट करत असे लिहिले आहे की, २००९ मध्ये बराक ओबामा हे पहिले राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती.

जगभरातून अनेक मोठ्या व्यक्तींनी, नेत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.