लडाख,कारगिल आणि सियाचीन ग्लेशियरच्या पुढील भागात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माइनस ६० अंश सेल्सिअस तापमानात आम्ही तुमचे रक्षण करण्यास तयार आहोत, असे जवानांनी सांगितले.अत्यंत कठीण परिस्थितीतही देशाचे रक्षण करण्याचा आमचा निर्धार आहे. देशातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा सण तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो अशी आम्हाला आशा आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

कारगिल, लडाख आणि सियाचीनच्या पुढील भागात तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनी गुरुवारी दिवाळीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये, जवान लोकांना सीमा सुरक्षित ठेवताना भारताच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन करताना ऐकू येत आहेत.

( हे ही वाचा: भारतानं अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहते बिथरले! ट्विटरवर सुरू झाला #Shame ट्रेंड! )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या दिवशी जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात लष्करी जवानांची भेट घेतली आणि त्यांच्यामुळेच देशातील लोक शांतपणे झोपू शकतात आणि सण साजरे करू शकतात, असे सांगितले. सैनिकांना संबोधित करताना ते म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकनंतर खोऱ्यात दहशतवाद पसरवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, पण भारताने त्यांना नेहमी चोख प्रत्युत्तर दिले आहे.