Friendship Day 2023 Wishes in Marathi: दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे भारतात साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा ६ ऑगस्टला रविवारी आहे. शाळा, कॉलेज मध्ये एकमेकांना फ्रेंडशीप बॅन्ड बांधून हा दिवस साजरा करण्याची पद्धत होती. बाकीच्या सगळ्या मित्रांसाठी एखाद्या लेसचा बँड आणि खास बेस्ट फ्रेंडसाठी घेतलेला मण्यांचा, सजवलेला बँड अशा आठवणी बहुधा तुमच्याही मनात अजून असतील. मध्यंतरी मार्करने हातावर नावं लिहून फ्रेंडशिप डे साजरा करण्याची पद्धत सुद्धा आली होती पण आता काळ बदलला आणि तसेच ट्रेंड्स बदलले आहेत. सोशल मीडीयाशिवाय आजच्या तरूणाईचा कोणताही सण साजरा होत नाही हे ही खरंय. त्यामुळेच फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देताना Facebook Messages, WhatsApp Status, Images, Greetings वर शेअर करण्यासाठी काही मजेशीर मराठी शुभेच्छापत्र आम्ही घेऊन आलो आहोत. आजच फ्रीमध्ये डाउनलोड करून उद्या तुमच्या मित्रांना हटके शुभेच्छा द्यायला विसरु नका.

हॅप्पी फ्रेंडशिप डे मराठी मजेशीर शुभेच्छापत्र

भले माझ्या मित्रांना रोज कितीही टोमणे मारा पण…
नशीब लागतं राव…
.
.
माझ्यासारखा बेस्ट फ्रेंड मिळायला..
हॅप्पी फ्रेंडशिप डे, दोस्ता!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

उधार मागणाऱ्या आणि उदार होऊन मदत करणाऱ्या
सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप डे.
.
तुम्ही आपले खास आहात!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

मला ‘मी’ म्हणून स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला
हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
-अनंत राऊत

हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

बर्थडेला ज्यांचा कॉल सर्वात आधी
चुकल्यावर ऐकवतात शिव्यांची यादी
सतत लेट येऊन करतो जो माज
चल जाऊदे, फ्रेंडशिप डे आहे आज,

माझ्या चहा पार्टनर्सना, हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

हे ही वाचा<< Friendship Day 2023: यंदा मित्र-मैत्रिंणीबरोबर साजरा करा फ्रेंडशिप डे! गोव्यातील ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट

तुम्हाला सर्वांना आमच्याकडून आजच हॅप्पी फ्रेंडशिप डे!