ती : सांग ना मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी?
तो : अॅ?? हे काय?
ती : अरे पहिली की दुसरी?
(चेहऱ्यावरची भीती आणि गोंधळ त्याला लपवता येत नव्हता.)
ती : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय
तो : तुला का ते जाणून घ्यायचंय? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का?
ती : अरे लेख लिहितेय मी, ‘मिठी’ की ‘मीठी’ लिहू? माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे! you know ना, माझ्या किती चूका होतात, म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी .
(आता कुठे बिचाऱ्याला हायसं वाटलं)
तो : मग सरळ ऱ्हस्व की दीर्घ असं विचार ना? पहिली की दुसरी हे काय? हात जोडले बुवा तूझं मराठी ऐकून.
ती : असू दे, जास्त शहाणपणा दाखवू नकोस तू! पण, by the way तू का घाबरलास रे इतका ?
तो : छे! काही काय? मी का घाबरू? हे मात्र उगाच.
ती : उगाच कसं? पाहिलं मी तुझ्या चेहऱ्यावर किती बारा वाजले होते ते.
(आता काय ही बया मला सोडणार नाही, त्याची खात्री पटली.)
तो : ‘तू पहिली’ असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही, ‘तू दुसरी’ म्हटलं तर ही मला जगू देणार नाही.)
ती : सांग ना तूझ्या मिठीतली मी पहिली की दुसरी?
तो : ‘तू… पहिलीच’
ती : thank you! (काहीशी लाजून)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा