Happy Independence Day 2023 Marathi Wishes: दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. १९४७ रोजी १५ ऑगस्ट रोजी भारताने १५० वर्षांची जुलुमी राजवट मोडून काढत ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले होते आणि पुढील वर्षी याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी या दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून पूर्ण एक वर्ष झाले होते. या आधारावर, यंदा २०२३ मध्ये, भारत ७६वा स्वातंत्र्यदिन (76th Independence Day) साजरा करत आहे. भारत स्वतंत्र होऊनही अजूनही अनेक कुप्रथा, सवयी व कुकर्मींपासून भारताला स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. भारतीयांच्या मनातील देश प्रेम, स्वातंत्र्यदिनाचा अभिमान व भविष्याबाबत अपेक्षा व्यक्त करणाऱ्या काही शुभेच्छा यंदा आपण Whatsapp Status, Facebook, Instagram Story वर शेअर करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा देऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्ली कोणताही सण ऑनलाईन शुभेच्छा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यात १५ ऑगस्ट हा तर सर्वांसाठी खास दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या आयत्या वेळी शोधाशोध करावी लागू नये आणि हटके शब्दातून आपल्या भावना व्यक्त करता याव्यात म्हणून ही फ्री डाऊनलोड करता येणारी शुभेच्छापत्र आजच बघून घ्या.

स्वातंत्र्यदिनाच्या मराठी शुभेछा चारोळ्या

१) ना जातीसाठी लढले,
ना धर्मासाठी लढले,
शूर भारतीय वीर,
फक्त देशासाठी लढले!
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा देणाऱ्या सुंदर चारोळ्या (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

२) या जन्माचा नजराणा,
मायभूमीस पेश व्हावा….
तिरंगाच माझा,
गणवेश व्हावा….

सांडावे रुधीर,
या मातृभूमीसाठी…
हरेक जन्मी,
भारत माझा देश व्हावा….

अजय नन्नार

स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा देणाऱ्या सुंदर चारोळ्या (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

३) रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा….
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा….
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा..
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा…

-अजय नन्नार

स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा देणाऱ्या सुंदर चारोळ्या (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

४) माय- भगिनी स्वतंत्र होवो
प्रत्येक व्यक्ती सुखात राहो
भ्रष्टाचार, हल्ले, बलात्कार
सारा कलंक पुसूनी जावो
देश माझा नव्हे, आपुला होवो

स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा देणाऱ्या सुंदर चारोळ्या (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

५) निळा, हिरवा, भगवा, पिवळा
करा साऱ्या रंगांची होळी,
देशप्रेमी तिरंगी गुलालाचा
लावा टिळा तुम्ही कपाळी

स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा देणाऱ्या सुंदर चारोळ्या (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तुम्हा सर्व वाचकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा! भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy independence day 2023 marathi wishes poems hd images free download to share on whatsapp status facebook svs