India Independence Day 2024 Wishes Quotes Greetings : स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असतो. यंदा १५ ऑगस्टला देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. याच ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी अबाधित ठेवण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहणासह देशभक्तिपर कार्यक्रम ठेवले जातात. या दिवशी प्रत्येक देशवासीय आपला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवले जातात. मग ते टेक्स्ट मेसेज असो, इन्स्टाग्राम, फेसबुक असो वा व्हॉट्सअॅप; प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi) शेअर करत असतो. हेच लक्षात घेत आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या खास मराठीतील शुभेच्छांची लिस्ट घेऊन आलोय.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मराठी

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi)

१) हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

२) सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपल्या देशाचे रुप
१५ ऑगस्टनिमित्त सर्वांना शुभेच्छा!

३) वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…
देशाला ठेवा एक मुलांनो, हाच संदेश आहे
स्वातंत्र्य दिवसाच्या मोक्यावर…

४) रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा!

५) स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

६) ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, वंदे मातरम्!

७) बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

८) सलामी द्या आपल्या तिरंग्याला, जो आपली शान आहे
सदैव उंच रहावा तो, जोपर्यंत आपल्यात जान आहे
जय हिंद, जय भारत, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

९) स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१०) देश आपला सोडो न कोणी, नातं आपलं तोडो न कोणी,
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१५ ऑगस्टसाठी खास मराठीत स्टेटस (Independence Day Status In Marathi)

१) दे सलामी… या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा जीव आहे,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

२) देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

३) भारत देश विविध रंगांचा,
विविध ढंगांचा आणि विविधता जपणार्‍या एकात्मतेचा,
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

४) जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा हमारा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

५) विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या कोट्स (Happy Independence Day Quotes In Marathi)

१) स्वातंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी सुभाषचंद्र बोस

२) एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।।
– विनायक दामोदर सावरकर

३) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच.
– लोकमान्य टिळक

४) सत्यमेव जयते – मदन मोहन मालवीय

५) दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे
– चंद्रशेखर आजाद

स्वातंत्र्य दिनासाठी खास एसएमएस (Independence Day Text Message In Marathi)

१) ‘वंदे मातरम्!
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्
फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !’

२) ना हिंदू, ना मुस्लीम फक्त माणूस बना माणूस.
वंदे मातरम, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

३) उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला.
देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

४) धर्म तिरंगा कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,
घराघरात तिरंगा सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,
हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यदिन २०२४ शुभेच्छा

५) पाऊस पडू दे देशभक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा,
अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा,
मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा…
78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy independence day 2024 best wishes messages greetings and quotes in marathi to share on whatsapp facebook and more sjr