Happy Mothers Day : आई हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचं पान आहे. आपल्या आयुष्यात तिचं स्थान, तिचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ती आहे म्हणून आपण या जगात आहोत. आपल्याला जग दाखवणारी माऊलीचे आपण कधी आभार मानत नाही. तिने आपल्यासाठी कधीही मोजता न येणाऱ्या असंख्य गोष्टी केल्या पण आपण कधीच तिच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत नाही. आपल्या जीवनातील आईचं महत्त्व समजून घेण्यााठी आणि सुंदर आयुष्य दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या मातृदिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या आईला सुंदर शुभेच्छा पाठवू शकता किंवा या शुभेच्छा लिहून आईला सुंदर ग्रीटिंग देऊ शकता. जाणून घ्या मातृदिनाच्या एका पेक्षा एक सुंदर शुभेच्छांचे मेसेज.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आई मायेची सावली, आई सुखाचा सागर
निळ्या आकाशाएवढा तिचा मायेचा पदर
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मदर्स डे २०२४ शुभेच्छा

खरं प्रेम कसं करावं
ते आईकडून शिकावं
मुलांना काहीच न मागता
त्यांना फक्त देत राहावं
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा : Mother’s Day 2024: तुमच्या आईला भेट द्या ‘या’ अनोख्या वस्तू, पाहा एकापेक्षा एक भन्नाट पर्याय…

ईश्वराची भक्ती केल्याने आपल्याला आई नाही भेटणार
पण आईची सेवा केली तर ईश्वर नक्की भेटणार
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मदर्स डे २०२४ शुभेच्छा

काळजाची हाक असते आई
नि:शब्द जाग असते आई
अंतरीचे गूढ असते आई
ईश्वराचे रूप असते आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माय म्हणूनी आनंदानं भरावी तुझी ओटी
पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावे तुझे पाय
तवा मले पायामधी दिसते माही माय
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा : Mothers Day 2024: ‘आई’साठी बनवा स्पेशल शुगर फ्री बदाम बर्फी, जाणून घ्या रेसिपी

सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते
आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मदर्स डे २०२४ शुभेच्छा

आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही
कितीही जन्म घेतले
तरी ऋण फेडू शकणार नाही
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेदनेनंतरची पहिली हाक तू
भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू
अंधाराला दूर करणारा प्रकाश तू
जगण्याला अर्थ देणारा खरा मंत्र तू
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मदर्स डे २०२४ शुभेच्छा

दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेय,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दु:खाचा डोंगर कोसळलेला असो
की सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
की आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते की फक्त आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy mothers day 2024 read mothers day wishes quotes sms greetings in marathi mothers day images photos ndj